छोट्या पडद्यावरचा अनोखा बादशहा भगवान दादा पालव!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

File Photo

मूकपट ते बोलपट ह्या प्रवासात,भारतीय चित्रपट सृष्टी अनेक कलाकारांनी अनेक भाष्यातून गाजवली.आज हे माझी कलाकार, हयात नाहीत.पण त्यांच्या आठवणी मात्र आजही जन मानसात आहेत.अशी जबरदस्त छाप त्यांनी चाहत्यांनवर सोडलेली आहे.कारण ह्या कलाकारांनी ही लोक मनोरंजन सेवा,मनपासन केलेली आहे.ह्या फिल्मी दुनियेत ते वावरले,बादशहाही बनले.झगमगाटात वावरले.शेवटी अतिरेकाने कफललकही बनले.कारण ही चित्रपट सृष्टी अंधेर नगरी चउपट राजा अशी आहे.जो तरला तो तरला.आपल्या जिवनाची बाजी कलाकारांनी धोका पत्करून लावली,हे विशेष.असाच एक मराठमोळा नट ह्या फिल्मी दुनियेत वावरला,पहूडला, गरुडझेपही घेतली. रंग रांगोटि करताना त्याने!अनेक चित्रपटही काढले.कांहीं चालले कांहीं आपटले!असा हा वस्ताद अवलिया कलाकार म्हणजेच,आपले भूमिपुत्र! स्व.भगवान दादा पालव!दादा हे त्यांच टोपण नाव.कारण ते चांगले व्यायाम पटू असल्याने,ते शरीर यष्टीने मजबूत होते व लोकप्रिय होते.म्हणून लोक त्यांना “दादा”म्हणत.अशा ह्या मराठमोळ्या कलाकाराची कहाणी,थोडक्यात पाहू.
स्व.भगवान आबाजी पालव ह्यांचा जन्म १९१३ साली अमरावती येथे झाला.त्यांचे वडील मुंबईतील गिरणी कामगार होते.त्यामुळे गिरण गावात राहणारे,भगवान दादा! हे रंगिले होते,त्यांना सिनेमा बद्दल फारच आकर्षण होते.त्यासाठी ते स्टुडिओत एक साधा कर्मचारी म्हणून कामालाही लागले.पण त्यावेळेस त्यांनी स्वतःची एक विचार सरणी व दूरदृष्टी ठेवली, की मी एकना एक दिवस तरी सिनेमा निर्मिती करणार!ते त्यांनी कालांतराने सिद्ध ही केले.त्यांना काम करता करता मुक पट सिनेमात संधी मिळाली,त्यात ते गर्क झाले.त्यामधे स्वता स्टुडिओत सेवेला असल्याने, त्यांनी फिल्मी दुनिया जवळन पाहिले होती,त्यामुळे त्यांना सिनेमा निर्मिती सोपी गेली.स्व भगवान दादा हे, पेलवान असल्याने,त्यांचं कुस्तीवर प्रेम अलोट होत.त्यांची मजबूत शरीर यष्टी मुळे त्यांना दादा म्हणून प्रचलित ते होतेच.त्यामुळे त्यांना मूकपट जमान्यात, खलनायकी गुन्हे जगताची कामे मिळायची.1938 साली बहाद्दूर किसान ह्या चित्रपटात! सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळाले.त्यांना अनुभव आल्याने,त्यांनी १९३९ ते१९४९ सालात त्यांनी,कमी खर्चाचे सिनेमे निर्मित केले. त्यामुळे ते चित्रपट सामान्य प्रेक्षकांना आवडायचे.त्यामध्ये मारधाड व गुन्हेगारी असायची.1941साली निर्मित केलेला “मोहिनी”सिनेमा बराच चालला.त्यामध्ये एस.राधा व श्रीलंकन नटी स्व.थवामनी देवी ह्यांनी कामे केली.परंतु 1942 साली त्यांच्या हातून एक दुखद घटना घडली,ती म्हणजे!एका छायाचित्रणाच्या वेळी स्व.ललिता पवार ह्यांच्या श्रीमुखात भडकावली आणि त्यांचा हाथ मजबूत असल्याने लालितां ह्यांचा एक डोळा निकामी झाला.ह्याने लालिता बाईंचं आयुष बदलून गेलं.त्यांच्या चेहऱ्याला लकवा ही झाला.त्यामुळे त्या चित्रपटापासून 4 वर्षे दूर राहिल्या.पण ह्याच मुखाचा व तिरले पणाचा फायदाही त्यांना अनेक सिनेमात झाला,असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
1942 साली “जागृती प्रकाशन” नावाची फिल्म कंपनी दादांनी काढली.त्यासाठी त्यांनी 1937साली चंबुर येथे स्टुडीओही घेतला.नंतर त्यांचा संबंध शोमन स्व.राज कपूर ह्यांच्याशी आला.त्यांनी दादांना सुचवले की,आत्ता आपण सामाजिक चित्रपट निर्मित करा! गुन्हेगारी मारधाड बंद करा.म्हणून त्यांनी 1951 साली सुंदर नटी स्व.गीता बाली ह्यांना घेऊन “अलबेला”हा सिनेमा निर्मित केला.त्यामध्ये ते स्वतः नट होते.संगीतकार सी.रामचंद्र , अर्थात चीतलकर ह्यांनी त्या चित्रपटातील गांण्याना संगीत दिले,त्यामुळे ती सर्व गाणी गाजली ती आजपर्यंत!हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला.विद्या बालन ह्यांच्या आजे सासऱ्यानी शिकवलेल्या पायऱ्या पायऱ्यान चा नाच त्यांनी केला, तो बराच गाजला.ह्याचा उपयोग अमिताभ बच्चन,ऋषी कपूर, गोविंदा व मिथुन यांनीही केला.हिंदी फिल्मी जगतात मारधाड व गुन्हेगारी ही प्रथम दादांनी आपल्या भुतांच्या गोष्टीवर आधारित,भेदी बंगला ह्या सिनेमात आणली.मग ही परंपरा आज गायत सुरू आहे.ही दादांची मोठी देण फिल्मी दुनियेला आहे.सुरुवातीला लोक त्यांच्या सिनेमांना हसत!पण मग त्यांच्या चित्रपटांना लोक नाचू व बागडू लागली.त्यामधे चीतळकरांचा मोठा हाथ होता.त्या दोघांचे रसायन जुळले होते.अलबेला निर्मितीने ते एका रात्रीत किर्तीमान व कुबेर जाले.तर त्यांना बाळकडू पाजले ते स्व.मास्टर विठ्ल हे त्यांचे गुरू होते.त्यांनीच भगवान दादांना व्यायाम शाळा व हाणामारीचे धडे दिले,त्यावर दादांनी आपली पोळी भाजली.1930 साली त्यांना स्व.निर्माते शिराझ हकीम ह्यांनी बेवफा आशिक ह्या मुकपट सिनेमात संधी दिली होती,त्यामध्ये विनोदी भूमिका त्यांनी केली होती.स्व.भगवान दादांनी जमेला,लाबेला दोस्ती,जलन,भेदी बंगला,अश्या सिनेंमानची निर्मितीही केली.त्यांनी निर्मित केलेल्या चित्रपटांवर,चित्रपट महर्षी स्व.वी.शांतारामही खुश होते.दादांच्या उतरत्या काळाची,स्पर्धा सुरू झाली,त्यांचा लाबेला,जमेला हे चित्रपट आपटले,त्यामध्ये त्यांना बंगाली नट स्व. किशोर कुमार यांनी त्यांना रसातळाला नेले.त्यांचे दोन सिनेमे समे हूए सपने व हस्ते रहना,ह्या निर्मितीत स्व.किशोर कुमार ह्यांच्या कडून दादांना सहकार्य लाभले नाही.ह्या चित्रपटांसाठी त्यांनी आपली सर्व पूंजी लावली.अस म्हणतात की वेळ आली की चारही बाजूंनी येते.हा काळ ह्या मस्तवाल अवलियाचा रसातलाचा व तोट्याचा ठरला.पत्नीचे दागिने गहाण ठेवले.ह्या दिवाळखोरीतून दादा परत कधी वर आलेच नाहीत.त्यात त्यांचा स्टुडिओही, आगीत भस्मसात झाला.जुहू येथील सात खोल्यांचा बंगलाही 7 मोटार गाड्यानसहित विकावा लागला.सर्व वैभवी चैनीच्या वस्तू विकाव्या लागल्या.त्यांच्या खाल्लया प्यायल्या मित्रानीही पाठ फिरवली.परत कधी चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन दादांनी केले नाही.कारण ह्या वावटळीत सर्वस्व गेले.ते पुन्हा आपल्या दादर येथील दोन खोल्यांच्या चाळीमध्ये आले.मग त्यांनी मिळेल त्या चित्रपटांत, मिळेल ती कामे केली व आपला उदरनिर्वाह केला.त्यामधे झनक झनक पायल बाजे व चोरी चोरी शिवाय विशेष भुमिका त्यांना मिळाल्या नाहीत.शेवटच्या काळात सिने आर्टिस्ट असोसिएशन तर्फे,₹5000 रुपयांची मदत कांहीं वर्षे मिळाली होती.अनेक कलाकार त्यांच्याकडे येत असत.स्व.भगवान दादांना शांताबाई हुबलिकर आजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,त्यावेळच्या सांस्कृतिक मंत्री स्व.प्रमोद नवलकर ह्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. रंगमंचावर दादा येताच टाळ्यांचा गजर झाला.त्यावेळेस त्यांनी आपला चस्मा काढला,आपल्या आनंदाश्रुनना वाट मोकळी करून केली.त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.कारण एवढी मोठी सेवा ह्या जगताची केल्यावर, केल्यावर,कुणीही सत्कार त्यांचा केला नव्हता,त्याने ते गहिवरले.त्यांच्या जीवनातील हा अस्मरणीय असा क्षण ठरला होता.कदाचित त्यांनी पाहिलेले वैभवाचे क्षण त्यांच्या डोळ्या समोरून,येऊन गेले असावेत.कारण माणसाने आधी कफ्ल्लक असावे,शेवटी नाही.
असा हा असामी अवलिया 4 फेब्रुवारी,2002 रोजी वयाच्या 88वया वर्षी,दादर येथील आपल्या चाळीतच सर्वाँना सोडून निघून गेला.त्यांनी केलेल्या मोठ्या रंग मंच सेवेसाठी त्यांना मानाचा मुजरा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *