
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
वृक्षारोपण, श्रमानुभव, परिसर परिचय, कलागुण दर्शन 151 अधिकारी व कर्मचारी सहभागी
मुंबई, जनकल्याण सहकारी बँकेने आपल्या अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी एक स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलं होते. एक दिवसीय कार्यशाळेत वृक्षारोपण, श्रमानुभव, अभ्यासवर्ग आणि विविध कलागुण दर्शन असा कार्यक्रम जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कर्जत येथील कोठिंबे येथे असलेल्या वनवासी कल्याण आश्रमात शनिवार दिनांक 14 मे रोजी झालेल्या वैशिष्ठयपूर्ण कार्यक्रमात जनकल्याण सहकारी बँकेचे एकूण एकशे पंचावन्न अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी नऊ ते सायंकाळी सात दरम्यान वृक्षारोपण, श्रमानुभव, आश्रमातील मारुती मंदिरात आरती आणि मारुती स्तोत्राचे पठण, वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थानिक कामाची माहिती, बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कलागुण दर्शन यातून एक अनौपचारिक कार्यशाळा घेण्यात आली.
सहभागी झालेल्या मध्ये संघ भावना निर्माण व्हावी यासाठी ड्रेस कोड तयार केला होता. बँकेच्या नाव आणि लोगोचे आकर्षक टी -शर्ट आणि कॅप सगळयांनी परिधान केल्या होत्या. सहभागी झालेल्यांचे दहा गट तयार करण्यात आले होते. दहा गट प्रमुख नेमले होते. आपली शाखा आणि खाते सोडून अन्य कर्मचाऱ्यांना आपल्या गटात घेण्याची व्यवस्था केली होती. या गटांना दिवसभराचे टास्क देण्यात आले होते.
कोठिंबा येथील आश्रमाचे पूर्ण वेळ काम करणाऱ्या विनायक जोशी यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची सविस्तर माहिती दिली. वनवासी क्षेत्रातील आव्हान आणि संधी यावर विनायक जोशी बोलले. जोशी दाम्पत्य वर्ष दोन हजार पासून कोठींबे येथे राहून पूर्ण वेळ काम करत आहे. विनायक जोशी यांची ओळख बँकेचे उपाध्यक्ष किशोर बागडे यांनी करून दिला. यावेळी बँकेतर्फे जोशी दांपत्याचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
बोरिवली येथील जनसेवा सहकारी बँकेचे संचालक पराग नेरुरकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उदयॊजक विवेक भागवत यांनी समारोपाच्या सत्रात सद्य सामाजिक स्थिती, सहकाराची भूमिका, देश, समाज आणि व्यक्ती म्हणून असलेली प्रतिकूलता आणि अनुकूलता तसेच, देशातील वनवासी क्षेत्र याविषयी सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमा निमित्त जनकल्याण सहकारी बँके तर्फे आश्रमाच्या परिसरात चार देशी झाडांची रोपटी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्पक आणि उपयुक्त एक दिवसीय शिबिराबद्दल सहभागी झालेल्या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.