जल समृद्ध भारताचा पाणी वाया का जातो?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

भारत हा उष्ण कटिबंध व मौसमी हवामानाचा प्रदेश आहे.ह्या देशात उन्हाळा,पावसाळा,हिवाळा हा ठरलेल्या काळत येत असतो. परंतु साधारणपणे भारतात एप्रिल महिन्याच्या शेवटी पाण्याची वानवा होते. खास करून महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा विभाग पाण्याअभावी असतो, खान्देशाची ही हीच परिस्थिती आहे.पण पावसाचा महिना आला की, पाण्यासाठी भटक्रांती करणारे हेच परिसर, तर पाण्याने दुथडी भरून वाहतात, नदीला नालयाना पूर येतात, गावाचे गावी पाण्याखाली जातात. मग हे सगळे पाणी मातीत मुरल्यावर, शेवटी खलाटीला जाऊन समुद्राला मिळते. पुन्हा तेच जल चक्र सुरू होते.समुद्राला चारही बाजूंनी धरणाचे नदी नाल्यांची, कालव्यांच्या पाण्याची भर पडते. मग समुद्राला उधाण येते.वादळी वारे, वादळा वगैरे सारखी, परिस्थिती निर्माण होते, मग नैसर्गिक आपत्ती जनक घटना घडतात. शेवटी काय पाणी असताना बोंब, पाणी नाही म्हणून बोंबा बोंब! यावर उपाय पाणी आडवा आणि जिरवा, हा जुना उपाय झाला.मग त्यापेक्षा एक काम सरकारने करायला पाहिजे, एका बाजूस पाऊस असतो, तर त्याच्याविरुद्ध काही ठिकाणी भाग कोरडा ठणठणीत असतो. बळीराजा आभाळाकडे पाहत असतो, पिके उन्हाने जळून जातात. जनावरे पाण्याअभावी मरून जातात, रानावना तील जनावरेही, मृत्युमुखी पडतात.मग त्यांना अशा परिस्थितीत,जीवाला! जगवायला तरी पाणी असावे लागते. मग इकडून तिकडून कशीबशी व्यवस्था सरकार करते.पण ही मदत सर्वांकडे पोहोचत नाही. मग हा भाग दुष्काळी म्हणून घोषित करावा लागतो. शेवटी भुर्दंड हा सरकरवर पडतो. या सगळ्या गंभीर विषयावर उपाय शोधला तर मिळू शकतो. नाहीतर जगात अशी कोणती गोष्ट नाही त्याला उपाय नाही?, प्रत्यक्षात उपाय आहेत, तरच या जल आपघाता मधून सोडवणूक करू शकते. त्यासाठी यंत्रणा राबवली गेली पाहिजे.अनेकांना त्याला लाभ होऊ शकतो हे निश्चित.काही योजना या लाभदायक आहेत प्रथम योजना अशी आहे की या दुथड्या वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह एकमेकांना जोडायचा. त्यासाठी काही वर्षे लागतील,पण जर हे काम मोठ्या प्रमाणात केलं लवकर होण्याची शक्यता आहे. साताऱ्याचा तपोळा हा भाग घ्या? हा भाग त्या प्रकारे कोयनेला जोडलेला आहे. आता तो भाग कसा समृद्ध आहे त्या ठिकाणी गावोगावी बोटी शिवाय जाता येत नाही. त्यासाठी गावाच्या गावे स्थलांतरित केल्यावरच ही किमया घडली.आज या ठिकाणी, कधी दुष्काळ पडलेला नाही. की पाण्याची वानवा नाही. येथे मे महिन्यात नदीला ही समुद्राला लाजवेल असे पाणी असते.आता जल शीवार योजनेने काहीच होणार नाही. कारण शेवटी जल साठा हा जमिनी कडेच खाली वळतो. पाण्याच्या प्रवाहात जाऊन मिळतो किंवा बोरवेल विहिरी खोदल्याने या शिवाराचे पाणी हे विभागले जाते. पाण्याची पुन्हा आणिबाणी निर्माण होते. नदी जोडणी ही व्यवस्था जर सरकारने योजना अमलात आणल्यास, संपूर्ण राष्ट्र, महाराष्ट्र हा पंजाब पेक्षा सुजलाम,सुफलाम होईल. पंजाबचे पहा ना भाकरा नांगल हा धरण प्रकल्प हिमाचल प्रदेशामध्ये आहे. पण पाणी पंजाबात फिरते. म्हणून पंजाब आपल्याला हिरवागार दिसतो. ज्या ठिकाणी कोरडवाहू प्रांत आहे त्या ठिकाणी या नद्या एकमेकांना जोडून हे पाणी त्या ठिकाणी फिरवावे मग पहा चमत्कार!नदीला येणारे पूर या ठिकाणी फिरवल्याने, या विभागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने,नेहमीच कोरडे असणारे नदी नाले व धरणात पुराचे पाणी या ठिकाण वळवल्यास, हा परिसर हिरवागार होईल. मग सरकारवरही आपत्ती पडणार नाही.ह्या धरणातून पडणाऱ्या पाण्यावर सरकार अनेक प्रकल्प घेऊ शकते. लोकांना काम मिळेल, तरुण वर्ग शेतीकडे मागे नक्कीच लागेल. महाराष्ट्रातील तरुण वर्ग वाया जाणार नाही.दुसरी योजना आहे ती म्हणजे डोंगर दऱ्यां मध्ये, जे मोठे मोठे विवर आहेत, त्या ठिकाणी आणखीन खड्डे मोठे करून, फुकट जाणारे जल प्रवाहाचा,मोठ्या प्रमाणत साठा करावा. धबधब्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.या धब धब्याने मुळे, दगड,मोठ्या दर्डी, कडे कपाऱ्यांच्या शेजारून पाणी वाहून जाते, त्यामध्ये मातीही वाहून गेल्याने, त्या मोठ्या प्रमाणावर कमजोर होतात.त्यामध्ये माणसं झाडांची कत्तल करतात, शहरीकरण करण्यासाठी, सरपणासाठी तेही हानिकारक आहे.अशा कृत्याने जमिनीची झीज होते आणि मग दरडी कोसळणे,भूस्खलन होणे, डोंगरच्या डोंगर चिखलाने वितळणे,हे प्रकार घडत असतात.मग धबधबे व इतर कारणांसाठी होणारी मातीची झीज थांबायची असेल, तर एक महत्त्वाचा उपाय म्हणजे डोंगर माथ्यावर वर संगील्या प्रमाणे पाणी अडवावे,हे जास्तीच डोंगराळ विभागात झाल्यास, जमिनीची मातीची होणारे झीज कमी होईल. गर्द झाडी,दगड,कडे कपरी, एकमेकांना गच्च धरून राहतील. एक सुंदर दृश्य निर्माण होईल,पर्यटक येतील. वरती पाणी साठा केल्याने, तळाच्या सपाटीला सगळ्या गावांना नवसंजीवनी मिळेल. परिसर हिरवळीने वाढेल. मोठ्या प्रमाणात साठवलेल्या पाण्यावर,मग धरणे बांधा. डोंगरावरून, धरतीवर पडणाऱ्या, पाण्यावर वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. विजेच् दुर्बिकशाही दूर होईल. पहायचे झाल्यास,आपल्या राष्ट्राला! आपल्या महाराष्ट्राला विजेचा तुटवडा नेहमीच असतो तो संपेल मग वीज ही स्वस्त दराने जनतेला वितरीत करतास येईल. महत्त्वाचे म्हणजे लोकांना रोजगार मिळेल, अनेक प्रश्न या पाणी अडवील्याने दूर होतील, हे निश्चित. आपण आपल्या खास महाराष्ट्राचा,विचार करू! या महाराष्ट्राला, सह्याद्री व डोंगर दर्‍यांचा इतिहास आहे. गड किल्ल्यांचा इतिहास आहे.येथे डोंगर दऱ्यांची कमतरता नाही. एका बाजूने सह्याद्रीची भीमथडी आहे. दुसऱ्या बाजूने सात पुड्याचा डोंगरद र्‍यांचा भाग आहे.वर कथित सांगितल्याचा उपयोग महाराष्ट्राने केला,तर महाराष्ट्र एक नंबरच्या वरच्या ही पलीकडे जाईल.सगळ्या समस्या चुटकी सरशी दूर होतील. फक्त सरकारने या महत्त्वाच्या जल
व्यवस्थेवर लक्ष देऊन काम करावे. फक्त महाराष्ट्राच्या भल्यासाठी राजकारण्यांनी, आपला स्वार्थ ठेवू नये. महाराष्ट्र प्रदेश कसा विकसित होईल याकडे लक्ष द्यावे.सर्व राजकारण्यांनी सदर कामासाठी, आपला पक्ष बाजूला ठेवावा! आपल्या राज्याचे,जास्तीत जास्त भले कसे होईल व केंद्रातून आपल्याला कसा जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल? याकडे लक्ष केंद्रित करावे. आपण मग वाटेल ते राजकारण करा!पण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकसंध व्हा! ही जनतेची आपल्याला पुकार असेल. कारण जनताच आपल्याला निवडून देते.मग जनतेची महत्त्वाची गरजेची कामे करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असेल. असे आम्ही जनमानस मानतो. आपल्याला विधानसभा,लोक सभेवर पाठवतो. हे लक्षात घ्या!?ह्या जल आपत्तीने, होणारी मनुष्यहानी संपत्ती आणि व वातावरणाची आणि होणार नाही.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *