प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : जुहू गल्लीतील भूखंड घोटाळ्यावर चर्चा करण्यास कधीही तयार, आशिष शेलारांनी वेळ व ठिकाण सांगावे –
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलारांना खुले आव्हान.जुहूचा भूखंड गमवाल व बांधकामाचे क्षेत्रफळही कमी होईल या बीएमसीच्या वरिष्ठ अभियंत्याच्या इशा-याकडे देवाभाऊ सरकारने दुर्लक्ष का केले ?सरकार व सरकारच्या ‘लाडका बिल्डर’ला वाचवण्यासाठी शेलार व अमित साटम यांची व्यर्थ धावपळ, सरकारचे पाप लपविण्यासाठी बिनबुडाचे आरोप करू नका.
जुहू गल्ली येथील मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा शेकडो कोटींचा आरक्षित भूखंड देवाभाऊ सरकारने, शासन आणि पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून, आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला भेट चढवल्याचा महाघोटाळा मुंबई काँग्रेसने उघडकीस आणल्या नंतर भाजपचे धाबे दणाणले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार आणि अमित साटम यांनी मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी बिनबुडाचे व अर्थहीन आरोप केले आहेत. सिटीएस क्रमांक २०७ या महापालिकेच्या भूखंडबाबाबत पुराव्यासह मांडणी केली आहे त्यावर बोला असे प्रतिउत्तर देत या घोटाळ्यावर जाहीर चर्चेसाठी वेळ आणि ठिकाण सांगा. मी तिथे हजर असेन असे प्रती आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांना दिले आहे.
भाजपाच्या तथ्यहीन आरोपांना सडेतोड उत्तर देत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या सरकारला वाचवत आणि त्यांच्या सरकारच्या ‘लाडका बिल्डर’ला वाचवण्यासाठी बरीच धावपळ केली. जेव्हा-जेव्हा हे मित्रजीवी सरकार मुंबईचा एखादा भाग त्यांच्या बिल्डर-उद्योजक मित्रांना भेट चढवतो, तेव्हा त्यांना जे समर्थन करण्यासारखे नाही त्याच्याही समर्थनासाठी पुढे यावे लागते. या प्रकरणात SRA ला मूळ NOC मुंबई महापालिकेने २०११ नाही तर २००९ साली दिली. तेव्हा महापालिकेच्या सत्तेत भाजपा भागीदार होता, आणि तेव्हा जे मुख्यमंत्री होते ते आता भाजपचे खासदार आहेत. फाईलवर हे देखील स्पष्टपणे दिसून येते की पहिल्यापासून या प्रकरणात काँग्रेसने तक्रार नोंदवून महापालिका भूखंड SRA प्रकल्पासाठी देऊ नाही, हीच भूमिका घेतली आहे. तेव्हा आपल्या सरकारचे पाप लपविण्यासाठी कृपया बिनबुडाचे आरोप करू नका. निराधार वक्तव्ये करण्यापूर्वी अधिकृत कागदपत्रे तपासावी असे म्हणत शेलार आणि त्यांच्या टीमच्या अभ्यासाठी आणखी काही ठोस पुरावे येथे देत आहे असे खासदार गायकवाड म्हणाल्या..
Ohh
Congratulations
Bad