प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,पर्यावरणाची हानी रोखणे आणि व्हिगन जीवनशैलीचा प्रचार यासाठी व्हाय व्ही केअर या संस्थेच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील जुहू-जेव्हीपीडी मैदानात अर्थ फेस्टिवल 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
देश विदेशातून हजारो व्हीगन आणि पर्यावरण वादी, प्राणी प्रेमी कार्यकर्ते यावेळी सहभागी होणार आहेत. दोनशेहुन अधिक प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी यावेळी असणार आहे. मनोरंजनासाठी विशेष लाईव्ह बँड, डीजे तसेच पर्यावरणाची हानी थांबवण्याच्या उद्देशाने व प्राण्यांवर होणाऱ्या क्रौर्य बंद व्हावे यासाठी दि.29 ऑक्टोबर रोजी अर्थरन चे आयोजन करण्यात आले आहे. यात 3, 5 आणि 10 किलोमीटर रन असे टप्पे असणार आहेत. कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही. तसेच यात सामान्य लोक ही थेट सहभागी होऊ शकतील.