
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मालती माने विद्यालय आणि बालमंदिरच्या शिक्षकांनी गांधी विचार परीक्षा अंतर्गत शिक्षक गटातील बुनियादी शिक्षा या पुस्तकावरील परीक्षा दिली. जळगाव येथील गांधी केंद्रांतून संचलित होणारी ही परीक्षा शिक्षकांनी जाणीवपूर्वक द्यायला हवी. यामध्ये शिक्षणाचा मुलभूत विचार समजून घेता येईल.
मालती माने विद्यालय इचलकरंजीच्या १३ शिक्षकांनी म्हणजे १००% शिक्षकांनी २ महिने पुस्तक अभ्यासून अंतिम पेपर दिला. हे पेपर जमा केल्यानंतर सहभागींना प्रमाणपत्र, विजेत्यांना पदक आणि शाळेलाही सहभागाचे सन्मानचिन्ह प्राप्त होते. याचे संयोजन मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांनी केले.
Msst
Good to know
Ohhh great