एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई :मालाड (पू ) येथील रहिवाशी जेष्ठ समाज सेवक रामदास धर्मा शिर्के यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रायगढ जिल्हा माणगाव तालुक्यातील सिलीम हे त्यांचे मूळ गाव आहे. ते बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र 423 चे माजी अध्यक्ष व सध्याचे उपाध्यक्ष होते. तर सांस्कृतिक सेवा मंडळ मौजे सिलीमचे ते अध्यक्ष होते. माणगाव तालुक्या मध्ये व मालाड मध्ये ते धाडसी सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने शिर्के कुटुंबीय व मालाड कुरार व्हिलेज परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. त्यांचा पुण्यानुमोदन व श्रद्धांजली चा कार्यक्रम रविवार दि 11 जाने. 2026 रोजी होणार आहे.
Rest in peace sir.
Rip