एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे यंदा प्रथमच दिवाळी २०२५ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते.गणेश हिरवे, वैभव पाटील संपादित या अंकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.संपुर्ण अंक रंगीत छपाई केला असून यातील सर्व लेख आणि कविता वाचनीय आहेत.मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत रेखीव आणि चटकन लक्ष वेधून घेणारे छायाचित्र असल्याने मन एकटक एकाग्र चित्ताने त्यावरच खिळते. नुकताच कल्याण येथे अक्षरमंच सामाजिक व संस्कृतिक प्रतिष्ठान आणि आनंद सांस्कृतिक सामाजिक संस्था डोंबिवली यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत जॉय दिवाळी अंकाने आपली यशस्वी मोहोर उमटवत पहिल्याच वर्षी लक्षवेधी दिवाळी अंक पुरस्कार पटकाविला.सदर पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते जॉय चे संस्थापक गणेश हिरवे आणि मुंबई अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनी स्वीकारला.पुरस्कार मिळाल्याने जॉय संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Good. Congratulations
Congrats