प्रतिनिधी:सुरेश बोरले

File photo
मुंबई, प्रसिद्ध बाल कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचा दिर्घ आजाराने निधन झालं. जयनिअर मेहमूद हे हास्य बाल कलाकार म्हणून प्रसिद्ध होते.1970च्या दशकांत प्राण किंवा मेहमूद हे प्रत्येक कलाकार चित्रपटत आपल्या कामा नुसार असायचे.त्याकाळी हे सगळे हुकमी एक्के होते.म्हणून ते सिनेमे चालायचे.असाच एक बाल कलाकार त्या दशकांत चित्रपटात असायचा.खास करून त्याकाळच्या लोकप्रिय नटा बरोबर किंवा त्यांचा खास बाल मित्र, भाऊ,नातलग वगैरे च्या भूमिकेत त्यांच्यासोबत कामे करायचा व आपली विनोदी चुणूक दाखवायचा.त्याची इतकी लोकप्रियता होती की,निर्माते त्याला सांगतील ते आर्थिक जन देऊन, त्याला आपल्या सिनेमात घ्यायचे.त्याकाळी ह्या बाल कलाकाराकडे,एक आलिशान गाडीही होती. जी गाडी मुंबईत काहींचं श्रीमंत लोकांकडे होती.पण ह्या बाल कलाकारावर, हास्यसम्राट स्व.मेहमूद आली यांची छाप होती. त्यांचा पडगा होता.मेहमूदजीन सारखीच बोलण्याची व नाचण्याची पद्धत,त्याने हस्तगत केली होती.स्वतः मेहमूद साहेबांनी त्याला “ज्युनिअर मेहमूद” ही पदवी बहाल केली होती.त्यांची हुबेहुब प्रतिकृती व नक्कल ह्या बाल कलाकाराने पेश केली आणि लोकांची मने जिंकली.मी स्वतः ह्या कलाकारच तीन दिवस जुहू येथे त्याकाळी छायाचित्रण पाहिलेलं आहे,दिसायला अगदी राजबिंडा होता.सचिन पिळगावकर ह्यांचा समकालीन मित्र.अर्थात ज्युनिअर मेहमूद. यांचे मूळ नाव नइम सय्यद.15नोव्हेंबर,1956रोजी त्यांचं जन्म मुंबईत झाला.ते चांगले गायकही होते.दिग्दर्शकही होते.त्यांनी 6 मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत.एकंदरीत 265चित्रपटात त्यांनी कामे केली.1967 साली नऊनिहाल ह्या चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली.त्यामध्ये त्यांनी आपली चुणूक दाखवली बालकलाकार ते ज्येष्ठ कलाकार म्हणून त्यानी 2011पर्यंत चित्रपटात कामे केली व नंतर दूरचित्रवाणी वरही त्यांनी लोकप्रिय मालिकेत कामे केली.असा त्यांचा प्रवास राहिला.आपण पाहिले असेल की ,युटूब वर अनेक कलकांरान चे किस्से!ज्यांच्या बरोबर त्यांनी कामे केली.ते किस्से दिलखुलासपणे सादर केले.मुलाखत देताना त्यांनी वापरलेली मृदू व संयमी भाषा,एका घरंदाज माणसाची होती.अनेक कलाकारांनी केलेलं सहकार्य ते आवरजून सांगत.तर ज्यांनी ज्युनिअर मेहमूद ही उपादी दिली त्या मेहमूद साहेबांना ते देवच मानत व त्यांची छबी त्यानी जपली.शेवटी कलाकार असो,राजा असो,सामान्य माणूस असो,त्याला जगाचा निरोप घ्यावाच लागतो.ज्युनिअर मेहमूद हे पोटाच्या कॅन्सर ह्या विकाराने,अनेक दिवस त्रस्त होते.अनेक इलाज करूनही,त्यांना फरक पडला नाही,ते सावरले नाहीत.अखेरच्या प्रवसात इस्पितळात,त्यांना अनेक कलाकर भेटून गेले,ज्यांच्या सोबत त्यांनी कामे केली होती.ते त्यांना भेटायला आले व दिलासाही देऊन गेले.परंतु कांहीं उपयोग झाला नाही. दिनांक 8डिसेंबर,2023 रोजी. त्यानी इह लोकांची या यात्रा संपवली व स्वर्गवासात निघून गेले.जवळ जवळ 50 वर्षांहूनही अधिक काळ,त्यांनी मनोरंजना द्वारे लोकांची सेवा केली.अनेक पारितोषिकेही मिळवली.एक मित भाषीय व स्पष्ट बोलणाऱ्या ह्या कलाकाराला,त्यांनी दीर्घकाळ केलेल्या फिल्मी जगताच्या व लोकांच्या मनोरंजनाच्या सेवेला सलाम !
Rip