
गोवर्धन असरानी
प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले गोवर्धन असरानी यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
असरानी यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत जवळपास ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटातील “जेलर” ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहे. त्यांच्या खास अभिनयशैलीमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक ठरले.
असरानी यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि लेखनही केले होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी सामाजिक माध्यमांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.
त्यांच्यावर अंतिम संस्कार मुंबईतील सांताक्रूझ येथील श्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.
🙏 असरानी यांच्या आत्म्यास शांती लाभो.
हिंदी चित्रपट सृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला…
असरानी सर यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांति ओम
Rip
Sự lựa chọn hoàn hảo cho game thủ! 55win33 có kho game đa dạng từ slot, baccarat đến thể thao, phục vụ đủ nhu cầu của mọi người!