
एसएमएस-प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.
नागपूर :दि. २१ फेब्रुवारी २०२६ : आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. रंजनाताई कवाडे यांचे शनिवारी पहाटे ४.१० वाजता नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जयदीप कवाडे यांना मातृशोक झाला आहे. त्या जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी होत. जोगेंद्र कवाडे हे लाँग मार्चचे प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार म्हणून ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मात्र आजाराशी झुंज देताना त्यांनी मानसिक धैर्य आणि सकारात्मकता कायम ठेवली होती. प्रा.रंजनाताई कवाडे या केवळ एका राजकीय कुटुंबातील सदस्य नव्हत्या, तर स्वतःच्या विचारांवर ठाम राहून कार्य करणाऱ्या प्रभावी मार्गदर्शक होत्या.
त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सह रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना आणि राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. महिला सक्षमीकरण, युवक संघटनांचे मार्गदर्शन आणि आंबेडकरवादी विचारांचा प्रसार यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले.
त्यांच्या पश्चात मुलगा जयदीप, मुलगी वैशाली, मुलगी सुजाता, सून प्रतिमा, नात निरिजा, नात अस्मिता तसेच नातवंडे व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
प्रा. रंजनाताई कवाडे यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४.३० वाजता नागपुरातील लक्ष्मीनगर येथील निवासस्थानातून निघून मोक्षधाम घाट येथे जाईल.
Rest in peace ma’am.
आदरांजली