
प्रतिनिधी :मिलन shah
मुंबई : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयामुळे दिग्दर्शक दीर्घकाळ आजारी होते, त्यानंतर प्रकृती खालावल्याने आज संध्याकाळी 6:29 वाजता त्यांचे निधन झाले. त्याची मुलगी पिया बेनिगल हिने इंडिया टुडेशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. त्यांना भारत सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले.