
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे ज्येष्ठ सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, समाजवादी कार्यकर्ते सुरेश कराळे यांचे आज पहाटे वयाच्या 66व्या वर्षी गोरेगांव पश्चिम येथील माध्यम सहकारी गृहनिर्माण संस्था मधील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन. त्यांच्या पश्चात पत्नी रश्मी, मुलगा सहित असा परिवार आहे. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी सेवांगण मध्ये सक्रीय सहभाग होता. त्यांच्या निधनाने एक समाजवादी चळवळीतला ज्येष्ठ कार्यकर्ता हरपला.