ज्वेलर्स दुकानात दिवसा प्राणघातक हल्ला प्रकरण आरोपी नाशिकहून ताब्यात.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

वसईत ज्वेलर्स दुकानात दिवसा प्राणघातक हल्ला; गुन्हे शाखा कक्ष ४ ची धडक कारवाई, दोन आरोपी नाशिकहून ताब्यात

पालघर :वसई पूर्व, वालीव येथे ९ डिसेंबर रोजी अंबिका ज्वेलर्स दुकानात लुटमारीच्या उद्देशाने घुसून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.

सकाळी ११.५७ च्या सुमारास फिर्यादी यांचे भाऊ कालुसिंग खरवट दुकानात असताना एक अनोळखी पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगा असे तिघे ग्राहक असल्याचे भासवून दुकानात आले. अंगठी दाखविण्याच्या बहाण्याने त्यांनी पाणी मागितले. कालुसिंग खरवट हे पाणी आणण्यासाठी आतल्या खोलीत जाताच त्या पुरुषाने त्याच्या मागोमाग जाऊन चाकूने पोट, हात, गाल व हनुवटीवर वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक ७०१/२०२५ अंतर्गत बि.एन.एस. कलम १०९, ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी प्रत्यक्ष भेट, सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेने संशयितांचा माग काढला. त्यानुसार आरोपी सोहेल शराफत खान (२३) आणि महिला आरोपी फिरदोस बानो सोहेल खान, दोघेही रहिवासी टेहरोली, जि. झांसी (उत्तर प्रदेश), यांना नाशिक रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी वालीव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री. निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) मा. श्री. संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) मा. श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत प्रभारी अधिकारी पोनि प्रमोद बडाख, सपोनि प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, तसेच मनोहर तावरे, संतोष मदने, शिवाजी पाटील, धनंजय चौधरी, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, समिर यादव, संदिप शेरमाळे, अश्विन पाटील, विकास राजपूत, सनी सुर्यवंशी, मपोहवा दिपाली जाधव व मसुब सचिन चौधरी आदी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.


Share

4 thoughts on “ज्वेलर्स दुकानात दिवसा प्राणघातक हल्ला प्रकरण आरोपी नाशिकहून ताब्यात.

  1. चोरीचे प्रकरण खुप वाढलेत कारण किती तरी युवक नशेचया हाहरी गेले आहेत तर काहि आलिशान जगन पसंद करतात म्हणून हे कोणताहि गुणा करायला घाबरत नाही आपली न्याय वेवसथा पारदर्शी होत नाही हे होतच राहणार

  2. पोलिसांनी अशाप्रकारे वेळीच (मुसक्या आवळल्या) कारवाई केली.तर चोरी होण्यास आळा बसेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *