टायकल मित्र मंडळाची हंडी ही फोडली कोकण नगर मंडळाने.

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : टायकल मित्र मंडळ बाल विकास शाळेजवळ, सर्वोदय नगर, जोगेश्वरी पूर्व या मंडळाची दहीहंडी ज्यांनी मुंबईत सर्वप्रथम दहा थर लावून विश्वविक्रम केला त्या कोकण नगर या स्थानिक मंडळाने सात थर लावून फोडली.मागील अनेक वर्षांपासून सर्वोदय नगर बाल विकास शाळेसमोर टायकल मित्र मंडळाच्या वतीने भव्यदिव्य दहीहंडीचे यशस्वी आयोजन करण्यात येते.यंदा देखील १०० ते १५० गोविंदांनी या ठिकाणी येऊन सलामी दिली त्यांना देखील सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कोकण नगर मंडळाने हंडी फोडल्याने त्यांना एकूण चार सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव राजेश खरात, अनंत तेली, प्रशांत सावंत, प्रवीण ठाकूर, राकेश डोनोलीकर, सिद्धेश कामत, मंदार परब, दत्ता राऊलकर, जयसिंग कांबळे, समीर मसुरकर, गीतेश घोणसेकर आदी मान्यवरांनी खूप मेहनत घेतली.मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात.


Share

One thought on “टायकल मित्र मंडळाची हंडी ही फोडली कोकण नगर मंडळाने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *