
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई, : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मुंबई महानगरपालिका मनसे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.
महानगरपालिकेतील मनसेच्या कामकाजाला अधिक गती देणे, नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडणे तसेच पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. यशवंत किल्लेदार हे अनुभवी, अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेत मनसेची भूमिका अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीबद्दल मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulations
कहीं ही करा पण आपसात मतभेद नको