प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई :बरेच दिवस सध्या,मीडियावर एकच विषय गाजतोय तो म्हणजे मनसे अधक्ष्य मा.राज साहेब ठाकरे व शिवसेना अधक्ष्य मा.उद्धवजी ठाकरे एकत्र येतील का?एकंदरीत सध्याची राजकीय व महाराष्ट्रातील मराठी लोकांची अवस्था पाहता,मराठी माणसाच्या सर्वागीण विकासाठी,ही युतीअत्यंत आवश्यक आणि जरुरीची आहे.नुकतच राज साहेबांनी त्रिभाषीय हिंदी विरोधात,जे आंदोलन छेडून मराठी अस्मिता जागवली व त्याला शिवसेनेसहित मराठी जनतेने जो कडवा विरोध दर्शवून,सरकारला दोन्ही जी आर रद्दबादल करायला लावले!हा एक विक्रमच आहे.त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची ,जी महाराष्ट्राची इच्छा आहे ती प्रफुल्लीत झालेली आहे.मग लोकांनी कांहीही बोलावे, निवडणुकीसाठी एकत्र आले वगैरे!ह्या गोष्टींना जनता भीक घालत नाही.तो राजकारणाचा भाग आहे.पण दोघांनी एकत्र येणं ह्या घडीला महत्वाच आहे.एकत्र येण्याच्या हवेनेच!सरकार एवढ हादरते!मग मराठी अस्मितेसाठी,आपल्याला काय काय करता येईल,ह्याची चुणूक येथे दिसते.पण ह्या दोन्ही भावांनी एकत्र आल्यावर,सत्तेत बसू नये.कारण सत्ता म्हटले की,चढा ओढ आली.खुर्चीची स्पर्धा आली.नाराजी आली.फितुरी आली. दल बदलगिरी आली.गलिच्छ राजकारण आले.सत्तेच्या चढाओढीत भांडणे होणार!मग ही युती टिकणार नाही.ही काळ्या दगडावरची रेघ आहे.ह्या युतीने राजकारणाचा सत्तेचा मोह आवरून,फक्त मराठी अस्मीतेसाठी जरी कार्य केले तरी पुरेसे आहे. त्यामुळे दोघांचीही राजकारणातील उंची आणि मान सन्मान पराकोटीचा वाढेल.हे जनतेने लक्षात घ्यावे.हा विचार अत्यंत्य महत्वाचा आहे.ज्या दिवशी दोघं मराठी मताच्या जोरावर सत्तेत आले की,दोन्ही भाऊ संपणार!ही दोघांना अंतिम संधी आहे.कारण मराठीला कोणच कैवारी नाही.त्यासाठी पुढाकार फक्त हेच बंधू घेऊ शकतात.यातील गाम्भीर्य लोकांनी जाणून मराठी अस्मिता टिकवायची असल्यास,दोघांनाही सत्ते पासून दूर रहाव लागेल. अन्यथा पुढे ० आहे.
Scam
छान