
एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई: महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ मधून विजयी झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक शहाजी ऊर्फ गणेश संपत खुस्पे यांचे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी खुस्पे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभागातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत विकासकामांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार नगरसेवक शहाजी ऊर्फ गणेश खुस्पे यांनी यावेळी व्यक्त केला.