प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे साहित्य प्रदर्शन शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी( ६डिसेंबर) अभ्यासू वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. खा. सुप्रियाताई सुळे प्रदर्शन पाहून म्हणाल्या की, “हा अमूल्य खजिना जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे.”
दुपारी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीही भेट दिली आणि खूप परिश्रमाने केलेले पुस्तकांचे जतन पाहून ग्रंथसंग्रहालयाचे अभिनंदन केले.
तसेच डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रदर्शन पाहून काही सूचना केल्या व प्रदर्शनाची मुदत थोडी वाढवावी जेणेकरून ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचेल असा सल्ला दिला.