एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपरुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संपदा मुंडे प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबाला दिले आहे. मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार, दि. 10 नोव्हेंबर, 2025 रोजी दुपारी 12 वाजता गिरगांव चौपाटी येथे आंदोलन करण्यात येणार असून मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
भाजपा महायुती सरकारच्या काळात मागासवर्गीय, दलित व महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य कुटुंबातील डाॅ. संपदा मुंडे यांना भाजपाचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. ही आत्महत्या नसून हत्याच आहे, व्यवस्थेने संपदाचा बळी घेतला आहे पण सरकार मात्र चौकशीच्या नावाखाली संपदा मुंडेंच्या मुख्य गुन्हेगारांना वाचवत आहे.
डाॅ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी कांग्रेस आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आंदोलनात युवक काँग्रेस सोबतच मुंबई काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत सर्व सेल, विभाग, फ्रंटल मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशा सूचना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे दोषीना सजा झालीच पाहिजे
Will Dr.SampadaMudhe will get justice???