
प्रतिनिधी :रोशन दरेकर
पुणे. दि.20.प्रेस मीडिया लाईव्हचा” तिसरा वर्धापन दिनानिमित्त आबेदा कॅम्पस, कॅम्प पुणे.या ठिकाणी नामवंत मान्यवराच्या उपस्थित “अचूक वाणी ” मराठी मासिकाचे संपादक मा. ताजुद्दीन हुसेन शेख यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार मा. डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच अल्पसंख्यां समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यापीठ स्थापन करून शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉसमोपोलिटन यांना डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते. माजी. आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थित रविवारी “राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.शैक्षणिक. सामाजिक. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदाणाबद्दल त्यांचा सन्मान ” प्रेस मीडिया लाईव्ह ” या वृत्त संस्थे मार्फत करण्यात आला. सन्मानचिन्ह, माणपत्र. फुले पगडी, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्रच्या सर्व जिल्यातील समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्वद मान्यवरच्या सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.

Congrats