
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मुंबई : सांगली जिल्ह्यात दिनांक १७ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान DSO राज्यस्तरीय आंतरशालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मालवणी येथील कला विद्यालयाचा विद्यार्थी कुमार नोकी अली मोंडल याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत कुमार नोकी अली मोंडल यांनी १९ वर्षांखालील वयोगटात, ७० किलो वजनगटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली व सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या नावाचा राज्यस्तरावर गौरव वाढला आहे.
ही राज्यस्तरीय स्पर्धा श्री लक्ष्या अकॅडमी सैनिक पॅटर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मणेराजुरी, जिल्हा सांगली येथे पार पडली.
कुमार नोकी अली मोंडल यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक विलीयम पायस, शिक्षकवर्ग, प्रशिक्षक तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उत्कृष्ट कामगिरी