
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : पनवेल येथील सेंट अँड्र्यूज स्कूल येथे पार पडलेल्या DSO विभागस्तरीय इंटर स्कूल थाई बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये मालवणीतील कला विद्यालतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी . या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी १ सुवर्ण व १ कांस्य पदक पटकावले.
दहावीतील कुमार नोकी अली मोंडल यांनी १९ वर्षांखालील वयोगटात, ७० किलो वजनगटात उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या या घवघवीत यशामुळे त्यांची निवड सांगली येथे होणाऱ्या DSO राज्यस्तरीय इंटर स्कूल थाई बॉक्सिंग स्पर्धा २०२६ साठी करण्यात आली आहे.
तसेच कुमारी झिकरा शेख यांनी १७ वर्षांखालील वयोगटात, ५२ किलो वजनगटात दमदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवले आहे.
Congrats