
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई, कांदिवली पश्चिम :दक्षिण कोरिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांना ही गरब्याचा मोह आवरला नाही. नुगा बेस्ट कंपनी चे व्यवस्थापकिय संचालक मुन सर आणि कांदिवली नुगा बेस्ट हाऊस च्या मालकीण धारा ओ. यांनी कांदिवलीतील नुगाबेस्ट हाऊस येथे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी गरब्याचे आयोजन केले होते. प्रसंगी मुन सर, धारा मॅडम, भगवती आई, हंसा बेन व शांती आणि श्रियंका मॅडम व ग्राहक गरबा खेळत असताना तिथे उपस्थित नुगा बेस्ट कंपनी चे व्यवस्तापकिया संचालक मुन सर यांनी ही मराठी, गुजराती आणि भोजपुरी गाण्यांवर गरबा खेळून सर्वांचे मन मोहले.दक्षिण कोरियाची कंपनी नुगा बेस्ट ही स्पाइन मॅनेजमेंटमध्ये आपला ठसा उमटवून 115 देशांमध्ये निशुल्क सेवा देत आहे, तर भारतात 213 केंद्रा मार्फत मोफत थेरपी देत आहे, तसेच मुंबईतील कांदिवलीत ही नुगा बेस्ट हाऊस मागील नऊ वर्षांपासून निशुल्क थेरपी देत आहे. यंदाची वार्षिक परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विविध सेवांसाठी सर्वोत्कृष्ट नुगा बेस्ट हाऊस ना गौरविण्यात आले , ज्यामध्ये मुंबईतील कांदिवली नुगा बेस्ट हाऊसने मुंबई स्तरावर चांगली कामगिरी करून पारितोषिक पटकावला होता, मागील सात वर्षा पासून दर वर्षी कांदिवली नुगा बेस्ट हाऊस तर्फे कर्मचारी, ग्राहकांसाठी गरब्याचे आयोजन केले जाते अशी माहिती सेंटर मालक -धारा ओह यांनी दिली.

