
प्रतिनिधी:वैशाली
मुंबई, मालवणीतील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्र सेवा दलाचे साथी गणेश क्षीरसागर यांचे वडील दत्तात्रय दादू क्षीरसागर (नाना) यांचे दिनांक 21 जुलै रोजी मध्य रात्री 12.05वाजता केईएम रुग्णालयात हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते नाना म्हणून प्रसिद्ध होते तसेच गणपतीच्या काळात ते पूजेसाठी साठी सर्वसामान्यांच्या घरी आवर्जून जायचे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी कांचन,मुलगे किरण आणि गणेश तसेच सुना आणि जावई व नातवंड असा भला मोठा परिवार आहे.त्यांचं अंतिम संस्कार मालवणी स्मशान भूमीत करण्यात आला प्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.