एसएमएस :प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे
मुंबई: कांदिवली येथील मातृभूमी एज्युकेशन सोसायटी च्या हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक दयानंद चंद्रकांत शिनगारे यांना पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेत्तर पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. मुलुंड येथील कालिदास नाट्य गृहात झालेल्या कार्यक्रमात भारतीय रिझर् बँकेचे संचालक,सतीश मराठे व सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को. ऑफ क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव किशोर पाटील यांच्या हस्ते दयानंद शिनगारे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. शिनगारे हे गेली अनेक वर्ष मातृभूमी शाळेत कार्यरत आहे. ते मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तर उत्तर मुंबईतील अनेक संस्था संघटनानी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतात हे आज पुन्हा सिद्ध झाले.
आपले शैक्षणिक कार्य खूपच मोलाचे व वाखाणण्याजोगे आहेत, प्रत्येक ठिकाणी हिरहिरीने आपण स्वतःला झोकून घेत असतात. हे यामुळे सिध्द झाले आहे.