
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
होय…. आम्ही बोलत आहोत.. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नरहर दर्गा !
..जिथे जन्माष्टमीला तीन दिवसीय जत्रेचे आयोजन केले जाते.
दरवर्षी येथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक मोठ्या संख्येने येतात.
नर्हद पीर बाबांच्या या दर्ग्यामध्ये लोक आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि धार्मिक विधी ही करतात.
इथली माती चमत्कारिक आहे असं म्हणतात.
जन्माष्टमीनिमित्त येथे तीन दिवसीय जत्रेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू भाविक बाबांच्या दरबारात हजेरी लावतात.
नरहद पीर बाबा, ज्यांचे खरे नाव सय्यद अलाउद्दीन अहमद होते.ते अजमेरचे प्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे शिष्य होते.हा दर्गा ख्वाजा साहेबांच्या दर्ग्यापेक्षा जुना आहे असे म्हणतात. दरवर्षी जन्माष्टमी आणि उर्स निमित्त येथे मोठी यात्रा भरते. जत्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो श्रद्धाळू येतात.