दसरा मेळाव्यास शिवतीर्थावर येणारे खरे शिवसैनिक : डॉ.नीलम गोऱ्हे

Share

प्रतिनिधी :कांचन जांबोटी

मुंबई,शिवसेनेचे खरे शिवसैनिक हे शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यास येणारी राज्यातील सामान्य जनता आहे. त्यांना कोणत्याही निमंत्रणाचा गरज नसते. अगदी लहान मुलांना पाठीवर घेऊन ग्रामीण भागातून येणारी सामान्य महिला कार्यकर्ता आणि शिवसेनेवर पक्षाच्या विचारांवर प्रेम करत असते, असे प्रतिपादन आज शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा काही लोकांना रोजगार काही पक्षात मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून शिवसेना पक्षावर टीका करणे हाच त्यांचा नारायण राणे कुटुंबीयांचा एकमेव उद्योग आहे.त्यांना ते करूनही कोणतीही प्रसिद्धी मिळत नाही, असे दिसल्यावर त्यांची मुले देखील काहीवेळा त्यांच्या मदतीला येतात.’

उद्धवजी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास लक्षात घेऊन त्यांच्या विश्वासार्हतेला तडा जाण्यासाठीच काम करण्याचा काही लोकांचा उद्योग आहे.”
असे असले तरी मा. ऊद्धवजी ठाकरे यांची सभा ऐतिहासिक व अविस्मरणीय असेल असा विश्वास नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्यभरात राबवलेल्या बये दार ऊधड मोहिमेची माहिती पत्रकारांना त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते ज्योती ठाकरे युवा सेना पदाधिकारी शितल शेठ महिला आघाडीच्या अश्विनी शिंदे, अनिता परदेशी उपस्थित होते


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *