
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई :जोगेश्वरी पूर्व अस्मिता संस्थेची ज्यांनी पन्नास वर्षापूर्वी स्थापना केली असे विष्णू गणेश पटवर्धन उर्फ दादा पटवर्धन यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग मुंबई या संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या ७ जून २०२५ रोजी अस्मिता शाळेच्या राजपुरिया सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना तो प्रमुख पाहुणे एम डी वळंजू, अविनाश दौंड, फादर निकी डीकोस्टा, सिस्टर रूषीला रिबेलो, वसंत ढोबळे, प्रदीप जोशी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत देण्यात येणार असल्याची माहिती जॉय संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी दिली आहे.दादांनी सुरू केलेल्या अस्मिता शाळेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत असून आतापर्यंत हजारो गोर गरीब वंचित विद्यार्थ्यांनी या शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले असून आज ते देशात आणि परदेशात विविध ठिकाणी मोठमोठ्या पोस्ट वर काम करीत आहेत.१९७६ साली दादांनी पुढाकर घेऊन जोगेश्वरीतील झोपडपट्टीत अस्मिता संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष अस्मिता विविध उपक्रमांनी साजरे करणार आहे.दादा बोरीवली येथे जरी वास्तव्यास असले तरी त्यांची कर्मभूमी जोगेश्वरी राहिलेली आहे.दादांचा अभिमान असल्याचे अनेकांनी वेळेवेळी सांगितले असून जीवनगौरव सारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अभिनंदन