
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेले दारफळ हे साडेचारशे उंबऱ्याचे गाव. नुकत्याच झालेल्या पावसात सीना नदीला आलेल्या पुराने या गावाची, शाळेची वाताहत झाली.
राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मदतनिधी गोळा केला आणि गावातील पूरग्रस्त कुटुंबांना पुण्याच्या संजय गायकवाड यांच्या सोबत पंधरा दिवसाचा शिधा गावाच्या सुपूर्द केला. दरम्यानच्या काळात सेवा दलाची मंडळी सातत्याने गावाशी संपर्कात होती.
आज ‘ वसुबारस ‘ दिवाळीचा पहिला दिवस.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते राजाभाऊ अवसक, संजय रेंदाळकर, संजय गायकवाड, सुहास कोते, जीवराज सावंत, वसंत एकबोटे, दीपाली आपटे, भारत घोगरे गुरुजी, प्रकाश कदम, रोहित दळवी, रोहित शिंदे, वैभवी आढाव आदी मंडळी दोन दिवस दारफळ गावात राहून गावकऱ्यासोबत, शाळेतील मुलांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत सोबत आणलेला दिवाळीचा फराळ वाटणार आहेत.
गावातील नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात आज संध्याकाळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसोबत ‘दिवाळी संध्या ‘ साजरी करुन आशेचे दिवे प्रज्वलित केले. नृत्य, गाणी ,संगीतातून संध्याकाळ प्रसन्न केली. विद्यार्थ्याच्या मनातील ताणतणाव दूर करण्याचा छोटासा प्रयत्न केला.
मुख्याध्यापक धावारे सरांनी सर्वांचे स्वागत केले.शाळेतील मुलांनी आपली गाणी, नृत्ये , नाटुकले सादर करत आपले दुःख झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘ पाडू चला रे भिंत ‘ असा विश्वास देत राष्ट्रीय एकात्मतेचा विचार दृढ करण्याचा प्रयत्न केला. देवा भालेराव, शिबा गायकवाड या पुण्याच्या कलापथकातील कार्यकर्त्यांनी मनोरंजन करत प्रबोधन करणारा आविष्कार संपन्न केला. यामध्ये नृत्य, नाट्य, गायन याचा सुंदर संयोग होता. यात प्रणव घोडे,विशाल इभाड ,कोमल इभाड,कृतिका कांबळे, अंतरा घाटकांबळे,स्विटी यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण गावातील लोक पटांगणात एकत्र आले आणि दिवाळीतून दिला जाणारा आनंद आणि स्नेह या निमित्ताने अनुभवला. वैभवी आढाव यांच्या ‘पणती जपून ठेवा ‘ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर गावातील जेष्ठ कार्यकर्ते विजय शिंदे यांनी आभार मानले.

राष्ट्र सेवा दल हे एक समाजा मध्ये खुप मोठ नाव आहे हे समाजा साठी २४/७ तास ३६५ दिवस काम करत असतात माझ्या कडून शत् शत् नमन
राष्ट्र सेवा दल हे एक समाजा मध्ये खुप मोठ नाव आहे हे समाजा साठी २४/७ तास ३६५ दिवस काम करत असतात म्हणून शत् शत् नमन
Great
Greatest