
प्रतिनिधी:सुरेश बोरले
आपल्या राष्ट्राचे नाव कोणीही व्यक्ती साता समुद्रा पलीकडे नेते किंवा आपल्या राष्ट्राचा ध्वज आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावते ती व्यक्ती सामान्य नसते ती व्यक्ती आपल्या राष्ट्राची एक विशेष व्यक्ती असते. मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो! म्हणून त्या व्यक्तीला मान असतो. सरकार दरबारी त्याचा सन्मान देऊन त्याच स्वागत केलं जात. असेच काही खेळाडू क्रीडा क्षेत्रातील, कुस्तीतील मातब्बर पैलवान ज्यांनी आपल्या राष्ट्रासाठी पदक आणलेल आहे, ते दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी काही दिवसांपासन, आपल्याला न्याय मिळावा! यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांचा असा आरोप आहे की, उत्तर प्रदेशचे आमदार जे की भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर महिला पहेलवानांवर शारीरिक छळ करण्याचा आरोप आहे.त्यासाठी जंतर-मंतरवर, या ठिकाणी आपल्या पुरुष पहिलवानांच्या सहकार्याने आंदोलन करीत आहेत. ह्यात त्यांचं काय चुकलं? कारण या हिंदुस्थानात आंदोलना शिवाय काहीच पदरी पडत नाही हे जग जाहीर आहे. बऱ्याच दिवसांपासून पासून शांततेने व लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलनाला आज गालबोट लागला आहे. दिल्ली पोलिसांनी आज त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे व जबरदस्तीने त्यांना बंदिस्त केलेल आहे. त्या पेहेलवानांची तेवढीच मागणी होती की, जर कुस्ती संघाच्या अध्यक्षांनी जर महिला खेळाडूंचा, जर शारीरिक छळ केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशी त्यांची मागणी होती. पण येथे उलट घडले आज त्यांनाच बंदिस्त करण्यात आलेल आहे. ही या सरकारची एक अतिशय बेजबाबदार खेळी आहे. त्यांनी आंदोलन अगदी शांततेच्या मार्गाने केले होते. कुठे दगडफेक नाही, कुठे घेराव,काचा फोडल्या नाही,कुठे गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता. मग त्यांच्यावर अशी कारवाई सरकारने का करावी? त्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्यावे, याचा अर्थ असा होतो की, सरकार त्या खासदारा ला क्लीन चिट देत आहे. हे येथे स्पष्ट होतं आहे.हे जनतेला अतिशय मनापासून खपलेल नाही. बरेच दिवस चाललेले हे आंदोलन सरकारी आदेशा नुसार, पोलिसांच्या दबावाने त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली.या सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आज अटक करण्यात आलेली आहे.ही बाब पटण्यासारखी नाही. त्यांना बंदिस्त करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की राष्ट्राच्या नावासाठी आपण मरमर मारायचे, काहीही सरकारी सुविधा नसताना आपल्या राष्ट्राला पदक आणून द्यायचे, पण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्यासाठी आंदोलन केले तर मग अटक हे जनतेला पटलेलं नाही. त्यांच्या पदरात अटक येते हे योग्य नाही. ही एक अतिशय वाईट खेळी आपल्या राष्ट्रासाठी आहे. कोणतेही सरकारी सुविधा नसताना, खेळातील आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या व कसोटीच्या जोरावर आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवयाचे आणि पदक जिंकून आणयाचे ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असेल, किंवा होत असेल,हे जर खर असेल तर त्याची शहानिशा सरकारने जरूर करावी! सरकारने नक्की या गोष्टीमध्ये लक्ष घालावे. व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.त्या खासदारांना येथे सरकार क्लीन चीट देत आहे, हे पुन्हा स्पष्ट होतय. त्यांची चौकशी व्हावी. हे न करता,सरळ या पैलवानांना अटक करावी, हे लोकशाहीला धरून नाही. त्याचा परिणाम येणाऱ्या तरुण खेळाळुंवर होऊ शकतो तसेच पैलवानी करणारे जवान हे कुस्तीपासून दूर जाऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी. एक चांगला नागरिक घडत आहे,या खेळाच्या सहाय्याने. त्यांना न्याय मिळत नाही.परंतु सरकारकडे अवहेलना मिळते. हे अतिशय अपमानकारक आहे. हे जनहिता विरुद्ध आहे. याची नोंद सरकारने घ्यावी व या सगळ्या क्रीडा पैलवानांना त्वरित सोडून या गोष्टीचा शहानिशा करावा.