
सागर कातुर्डे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’; आरएसबी मुंबई ओव्हरऑल विजेता
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई :दिनांक १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत आरएसबी मुंबईने दमदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले. सागर कातुर्डे याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकावत वैयक्तिक गटात सर्वोच्च मान मिळवला, तर आरएसबी मुंबई संघाने एकूण चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य पदकांची कमाई करत ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर शिक्कामोर्तब केले.
संघाच्या यशात संभाजी शेळके, आशुतोष सहा, शैलेंद्र यादव, किरण मुळमुळे आणि संतोष ठोंबरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांच्या पदकांनी संघाची एकूण आघाडी भक्कम केली.
या यशामागे प्रशिक्षक विजय झगडे आणि संघ व्यवस्थापक सूर्यकांत सालम यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. खेळाडूंची काटेकोर तयारी, शिस्तबद्ध सराव आणि संघभावना यामुळेच हे यश शक्य झाल्याची प्रतिक्रिया संघाकडून व्यक्त करण्यात आली.
देशभरातील राज्य आणि केंद्र सरकारी विभागांचे तब्बल ४२ संघ व सुमारे १७० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या कडव्या स्पर्धेत आरएसबी मुंबईने बाजी मारत आपली ताकद सिद्ध केली.
खुप सुन्दर जय हो हार्दिक शुभकामनाएं