
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : दिव्यांग व्यक्तीला दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार अपूर्व कुलकर्णी यांना 3डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत विद्यानभवन येथे सकाळी प्रदान करण्यात आला आहे.व्यावसायिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक कामगिरीसाठी कुलकर्णी यांना गौरवण्यात आले..

वयाच्या 7 व्या वर्षी, कुलकर्णी यांना गंभीर दृष्टीदोष झाला. तरीही त्यांनी जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली. के पी एम जी मध्ये पहिला दृष्टी-बाधित चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून काम करणे असो, अमेरिकेच्या च्या प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एबीए प्रोग्राममध्ये पहिला दृष्टी-बाधित भारतीय असो, ola(OLA ) ग्रुपमधील पहिला दृष्टी-बाधित कर्मचारी असो किंवा राष्ट्रीय संस्थेतील तज्ञ समितीच्या पदांद्वारे धोरण बदलणे असो, वा शहरी घडामोडींचे (NIUA), भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (FICCI) असा अपूर्व यांचा प्रवास आहे.
ओला मोबीलिटी इन्स्टिटयूट (OMI Foundation; earlier Ola Mobility Institute) (Think tank) येथे त्यांनी संशोधन प्रमुख म्हणून कार्य केले आहे.
कुलकर्णी यांनी दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी टेक-सोल्यूशनची संकल्पना मांडली. याबद्दल त्यांना युनायटेड नेशन्स इंडिया आणि एनआययुए (NIUA) द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
दिव्यांग महिला आणि पुरुषांच्या अनुभवांवर ‘ऑन द मूव्ह’ हा अहवाल त्यांनी लिहिला. हा अहवाल अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने त्यांनी तयार केला आहे
कुलकर्णी यांना युनायटेड नेशन्स, भारत, NIUA, NITI आयोग, फिक्की (FICCI ), भारतीय उद्योग महासंघ (CII) आदी ठिकाणी म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. तसेच ते उत्कृष्ट सायकलपटू आहेत.

वाहतूक व्यवस्था ही अर्थव्यवस्थेच्या जीवन धमन्या आहेत असे कुलकर्णी मानतात. देशाच्या मानवी भांडवलाचे संपूर्ण मूल्य अनलॉक करण्यासाठी सर्वसमावेशक वाहतूक पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, कुलकर्णी अपंग व्यक्तींसह सर्वांसाठी शहरी वाहतूक समावेशक बनवण्यासाठी काम करत आहेत. त्याला असा भारत पहायचा आहे जिथे कोणीही आत्मविश्वासाने, सुरक्षितपणे, परवडणाऱ्या आणि मागणीनुसार उत्स्फूर्तपणे प्रवास करू शकेल.