प्रतिनिधी :सुरेश बोरले

सद्या रत्नागिरी जिल्ह्यातील,बारसु येथे येऊ घातलेला रिफायानारी प्रकल्प बराच गाजतोय. तो गाजयला कारणही तसे आहे. कारण प्रकल्पात जमीन खरेदीने जो उच्छाद मांडला आहे, त्यामध्ये विशेष करून राज्याचे सनदी अधिकारी व परप्रांतीय खरेदी करणारे आहेत. कन्याकुमारी ते थेट जम्मू काश्मीर पर्यंतचे धनदांडगे यामध्ये सामील आहेत. याच्यावर एक सिद्ध होते की, आमच्या महाराष्ट्र राज्याची, राजकारणी लोकांची पातळी किती हीन दर्जाची आहे. हे लिहिताना आम्ही जनते समोर दुःख मांडतोय. बारसू प्रकल्प हा येथे येण्या पूर्वीच,ह्या ठिकाणी जमिनीचे व्यवहार झालेले आहेत. स्थानिक गावकऱ्यांनी अनेक परप्रांतीयांना जमिनी विकून त्यांना करोडपती बनवले आहे. कारण वर्तमान सरकारच्या हट्टापोटी हा प्रकल्प येथे येणारच, पण भूमिपुत्रांना त्यांना,भिकेला त्यांचा चुकीमुळे लावून. एका दूरचित्रवाणी वाहिनीवर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिलेले आहे की,ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पात जमिनी खरेदी केलेल्या आहेत, त्यांची चौकशी होणार! पालकमंत्री साहेब आपण राजकारणी फक्त आश्वासने देणार. पण कृती लवकर नाही करणार. हे सर्वश्रुत आहे. बारसू प्रकल्पाच्या या प्रकरणात कदाचित आपल्याला ही माहितीही नसावे, असे घडले आहे किंवा आपल्याला माहिती असेल पण आपण दडवत आहात, असा लोकांना संशय आहे. पण आपल दिलेल्या आश्वासन हे फोल हा ठरवलय,ते दैनिक “पुढारी”या वर्तमानपत्राने. ह्या पेपरच्या शिलेदारांनी जी मेहनत घेतलेली केलेली आहे, आपल्या आधी सरसकट जमीन खरेदी झाल्यानंतर, त्या व्यक्तींच्या नावासकट त्यांनी माहिती जनते समोर मांडलेली आहे. त्यांना सॅल्यूट. जनता या वर्तमानपत्राचे आभार मानत आहे. कारण पुढारी हे दैनिक कोणाचे मिंदे वाटत नाही. की कोणाच राजकीय वरदहस्त येथे दिसत नाही. एकदम सरळ सरळ रोखठोक, वर्तमान घटननावरती,लिहिणार हे पत्रक आहे.ते आता जनतेला आता कळलेल आहे. त्यामुळे बारसू प्रकल्प प्रकरण आता वेगळेच वळण घेत आहे,हे विशेष. सगळी कृपा आहे की दैनिक पुढारी ची! पालकमंत्री आपल्याला, ह्या गोष्टी माहीत होत्या किंवा नाही,पण जमीन खरेदी हा या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग आहे.त्यामध्ये सनदी अधिकारीही दोषी असू शकतात.असे लोक म्हणतात. त्या सनदी अधिकाऱ्यांना हे प्रकरण आधी माहीत होतं,मग त्यांनी तिथल्या स्थानिकांना, एक सरकारी मुलाजिम म्हणून का नाही जाग केलं?त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे होतं, थांबा जमिनी नंतर विका. पण हे आपलं कर्तव्य करायचं सोडून, आपणच आधी जमीन खरेदी करून मोकळे झालात. हे कितपत योग्य आहे? म्हणजे आपणच पहिले परप्रांतीनपेक्षा, महाराष्ट्राचे अधि भक्षक बनलात. याची सरकारने नोंद घ्यावी. आज विरोधकांच्या माग, नेहमीच दूरचित्रवाणीवर विरोधी भाषा करणारे,पालकमंत्री!आज विरोधकांचीच कास का पडत आहेत? अर्थात राजकारणाचे भीष्माचार्य शरदराव पवार यांच्याकडे आपण, सल्ला मसलती साठी का जाता? हा आदेश कदाचित दिल्लीवरून आला असावा. कारण तेवढे आपण राजकारणात प्रगल्भ नाहीत. असे जनमाणसांचे मत आहे. कारण दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन आपण किती दिवस चालणार? हे आपण ठरवायचे आहे.कारण कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे झालाच पाहिजे हा दिल्लीचा आदेश असावा! आणि दुर्दैव आहे की आपणच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात! आता तुमची कसोटी आहे. हा प्रकल्प आपल्याच भोवती फिरणार.