
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई :कांदिवली पूर्वेतील गोकुळ नगर येथील ” द शिवाय बार आणि रेस्टोरंट ” चे नाव बदलण्याचा मालकाला मनसे चा इशारा.”द शिवाय पॅलेसआणि रेस्टॉरंट “या नावाने सुरु असलेल्या बार चे नाव बदला या बाबत मनसे चे राकेश शंकर धनावडेविभाग सचिव यांनी द शिवाय बार आणि रेस्टॉरंट चे नाव बदलण्यासाठी चे पत्र मालक पंकज शुक्ला यांना दिले आहे हा बार मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचा परवाना पंकज यांच्या पत्नीच्या नावे आहे. राकेश धनावडे यांनी दिनांक ०४/०६/२०१९ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने देवी देवता, संत महात्मा, राष्ट्रीय नेते, गड किल्ले यांच्या नावावरून कुठल्याही दारू विक्री किंवा मांस विक्री करण्यात येणाऱ्या व्यवसायला परवानगी देता येत नाही असा स्पष्ट आदेश आहे.असे असताना ही आपल्या विभागात आपल्या डोळ्यासमोर आपल्या दैवताचा अपमान झालेला आम्ही सहन करनार नाही असा दाखला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की
मागील अनेक दिवसापासून नागरिकांच्या माध्यमातून याबाबत तक्रार येत होती. हिंदू धार्मियांचे आराध्य दैवत महादेव, श्री शिवशंकर यांच्या यांच्या नावाचा वापर करून येथे दारू विक्री, मांस विक्री होत आहे. या माध्यमातून हिंदू धार्मियांच्या दैवताचा अपमान होत असल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली. तसेच लोकशाही पद्धतीने हा इशारा देत जर काही दिवसाय नाव बदलले नाहीतर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येणार असे ही राकेश धनावडे म्हणाले आहेत.