धामणकर कृती समितीची अभिवादन सभा: ज.वि. पवार यांचे मार्गदर्शन.

Share

एसएमएस-प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई :दलित पॅन्थर चळवळीचे अग्रणी नेते, पत्रकार आणि लेखक शहीद वसंत धामणकर यांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त सांताक्रूझ (प.) येथील भीमवाडा परिसरात शहीद वसंत धामणकर कृती समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन नेते विवेक गोविंदराव पवार यांनी भूषवले, तर प्रमुख वक्ते म्हणून दलित पॅन्थरचे संस्थापक ज. वि. पवार उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. उत्तम जागिरदार, सुबोध मोरे, प्रा. डॉ. रमेश कांबळे, सुमेध जाधव यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पॅन्थरचा पराक्रमी कार्यकर्ता १९७४ साली नागपूर येथे झालेल्या दलित पॅन्थर अधिवेशनाला उपस्थित असताना वसंत धामणकर यांचे इंदोरा येथे अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव नागपूरहून मुंबईत आणण्यात आले होते. त्या वेळी नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा दाते, भाई संसारे, अविनाश महातेकर, अर्जुन ढांगले, उमाकांत रणधीर, रामदास आठवले, अरुण कांबळे आदी पॅन्थर नेते आणि सुमारे पाच ते सहा लाख लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

वसंत धामणकर हे दलित पॅन्थरचे पहिल्या पंक्तीतील कार्यकर्ते होते. ते अभ्यासू लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणूनही ओळखले जात. त्यांच्या अकाली निधनाने पॅन्थर चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जाते.

तरुणांनी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यावे – ज. वि. पवार

“देशात जातीयवादाचे विष वाढत आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली समाजात फूट पाडली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही वाचवायची असेल तर तरुणांनी एकत्र यायला हवे. वसंत धामणकर यांचा आदर्श घेऊन आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे.”

प्रचंड पावसातही जनतेची उपस्थिती

पावसाचा जोर असतानाही भीमवाडा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशासाठी बौद्धजन पंचायत समिती क्र. १५३ व ४३३ महिला मंडळ यांच्यासह रतन अस्वारे, सो. ना. कांबळे, के. जी. पाठारे, महेंद्र जाधव, सुनिल गमरे, तुकाराम जाधव, विशाल तांबे, अनोज मोरे, संतोष कासारी, प्रभाकर गायकवाड, शैलेश पवार, मंगेश गमरे, संदिप झोरे, विजय गमरे, अक्षय गमरे, प्रसंजीत धोत्रे, संध्या पवार, ज्योती गमरे, रजनी गमरे, साधना सुरदास, वर्षा कदम, सुजाता गमरे, उन्नती जाधव, माधुरी मोहिते, पाईकराव बाई, संध्या जाधव, शोभा पवार, सुनिल सुर्यगंध, विक्रांत पवार, शॉन स्वामी आदींनी विशेष परिश्रम घेतले.


Share

4 thoughts on “धामणकर कृती समितीची अभिवादन सभा: ज.वि. पवार यांचे मार्गदर्शन.

  1. वसंत धामणकर यांचा आदर्श घेऊन आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे

    1. शहीद वसंत धामणकर यांच्या ५० व्या स्मृतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *