
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांसाठी आज ‘नगरसेवक मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरात विविध विभागांतील तज्ञांनी महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांना संबोधित करताना, खंबीर विरोधी पक्ष म्हणून मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचे आणि नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल प्रभू, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनिल शिंदे, मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, माजी महापौर विशाखा राऊत, आमदार वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसेना सचिव सुरज चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे, नगरसेवक रमाकांत रहाटे, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, नगरसेवक सुहास वाडकर, स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे आणि नगरसेवक निशिकांत शिंदे उपस्थित होते.
Good