
फोटो :मांजरीला फेकतानाचे दृश्य सि्सिटिव्हित कैद.
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई :मालाड मालवणीत मांजरेला 9व्या माळ्यावरून फेकून दिल्याची घटना सि्सिटिव्हित कैद. मालवणी गेट क्रमांक 8 म्हाडा वसाहती च्या ग्रोव मोर या इमारतीच्या 9व्या माळ्यावर गॅलरीत बसलेली एक मांजर दिसत आहे तिथे काही वेळेत एक जण येतो आणि पुढे जातो परत फिरतो मांजरेवर मायेचा हात फिरवतो मात्र काही क्षणातच त्या मांजरेला उचलून खिडकी मधून खाली फेकून देतो. ही घटना दिनांक 5 जून संध्याकाळी 6.48 वाजताची आहे आणि इमारतीतील दुसऱ्या एका व्यक्ती च्या सि्सिटिव्हित कैद झाल्याने हे प्रकरण प्रकाशात आले आहे. या बाबत मालवणी पोलीस ठाण्यात दिनांक 10 जून रोजी सदर प्रकरणात आरोपी कासम सय्यद यांच्या वर मांजरेला 9व्या मळ्यावरून फेकून देत तिचा खून केल्याची लेखी तक्रार त्याच इमारतीत राहणारे मोहम्मद उमेर शमसी यांनी मालवणी पोलिसांना लेखी तक्रारदिली आहे त्यात त्यांनी घटनेचा संपरण उल्लेख करत सिसिटीव्ही पुरावा म्हणून सोबत दिले आहे. मालवणी पोलीस पुढील तपास करत आहे.
कोट :ही घटना अतिसंताप जनक आहे.आपण प्राण्यांशी कसे वागतो हे आपण ज्या समाजात आहोत त्याचे प्रतिबिंब आहे. हे भयानक कृत्य दाखवते की आपण अमानुष बनलो आहोत.-करिष्मा -कॅट लव्हर (मांजर प्रेमी त्यान्च्या कडे स्वत 7 मांजरी आहेत आणि त्यांचा ते मुलांसारखं सांभाळ करतात
क्रूर कृत्य