
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मालाड मालवणी म्हाडा येथे राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद हनीफ मौलाना शेख ७४ वय यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.काही दिवसापूर्वी मोहम्मद हनीफ शेख हे राहत्या घरी पडले होते व त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांचे दिनांक २४ रोजी संध्याकाळी ७वाजताच्या सुमारास खासगी रुग्णालयात शेख यांचे निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार दिनांक २५ रोजीदुपारी ३ वाजताच्या दरम्यान मालवणी कबरस्तान (दफन भूमी) येथे करण्यात आले प्रसंगी स्थानिक, नातेवाईक आणि मित्र मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा, ४ मुली पत्नी आणि नातवंड असा भला मोठा परिवार आहे..
So sad
Rip