नेताजींचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथे उभारण्याची मागणी.

Share

एसएमएस-प्रतिनिधी-उत्कर्ष बोर्ले
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवंड व जयहिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक चंद्रकुमार बोस यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे नेताजींचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.
२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केली होती. या ऐतिहासिक घटनेच्या ८२व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जयहिंद सैनिक संस्थेतर्फे देशभक्तीपर कार्यक्रम पार पडले. मुंबईत दादर आरजू सभागृह, मरीन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना आणि अंधेरीतील बगडगा टिब्रेवाला कॉलेज येथे चंद्रकुमार बोस, पंजाबराव मुधाने, इक्बाल मेमन ऑफिसर आदींच्या उपस्थितीत झेंडावंदन आणि विविध सन्मान सोहळे पार पडले.
या प्रसंगी बोस म्हणाले, “१५ ऑगस्टप्रमाणेच दरवर्षी २१ ऑक्टोबरला लालकिल्ल्यावर तिरंगा फडकवावा,” अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात आणि २६,००० शहीदांचे स्मारक दिल्ली व मुंबईत उभारावे, अशीही मागणी त्यांनी केली.

कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना “राष्ट्रभक्त पुरस्कार” प्रदान करण्यात आले. जयहिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर देशभक्तीचे जागरण घडवून आणल्याबद्दल बोस यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले


Share

5 thoughts on “नेताजींचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथे उभारण्याची मागणी.

  1. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे नेताजींचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी मान्य केली तर खरच मनापासुन सरकारच धन्यवाद करु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *