प्रतिनिधी :मिलन शहा
क्रिकेट :नेपाळ आणि नेदरलँड् यांच्यात एक अतिशय मनोरंजक T20 सामना खेळला गेला. प्रत्यक्षात नेदरलँड् ने प्रथम खेळताना 152 धावा केल्या. नेपाळने 20 षटकांत 152 धावा केल्या. सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हर मध्ये नेपाळने 19 धावा केल्या. नेदरलँड्ही ने 19 धावा केल्या. अशा प्रकारे सुपर ओव्ह मध्ये ही टाय झाले .
पुन्हा दुसरी सुपर ओव्हर सुरू झाली. यावेळी नेदरलँड्सने 17 धावा केल्या. नेपाळने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून फक्त 17 धावा केल्या. अशा प्रकारे दुसरी सुपर ओव्हरही बरोबरीत सुटण्याची ही कदाचित पहिली वेळ.
तिसरी सुपर ओव्हर विचित्र होती. नेपाळला एकही धाव करता आली नाही, दोन्ही खेळाडू शून्यावर बाद झाले. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारून नेदरलँड्सने विजय मिळवला.
असा रोमांचक आणि अटीटतीचा सामना आतापर्यंत क्रिकेट च्या इतिहासात झाला नव्हता.
Goodcricket