प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई :महाराष्ट्राचा शेतकरी हा आधीच महापुराच्या आपत्तीने बाधीत आहे.त्याच्या शेतात कांहीच राहिलेले नाही.ह्या पुराने त्यांच्या शेतातील मातीही वाहून गेलेली आहे.तो मातीचा भर भरून निघायला कमीत कमी २५ वर्षे लागणार आहेत.तर ही सगळी खरीप व रब्बी पीक घेताना त्याला बँकेशिवाय पर्याय नसतो.ते कर्ज घेऊन हा बळीराजा लाखो एकर जमिनीवर पीक पिकवतो.घरासाठी बेगमी केल्यावर,जे उरलेल धान्य विकून!त्या कर्जाचे हप्ते फेडतो व नंतर घर चालवतो.पण ह्या पुराने तर एक रोपही शिल्लक ठेवलेलं नाही.मग नाटकं करून गेलेल्या नेत्यांनी नुकसान भरपाईची आश्वासन दिलेली होती.त्यांची पाठ फिरतच! ह्या बँकांनी त्वरित शेतकऱ्यांच्या घराबाहेर तसेच शेताच्या बांधानवर कर्ज वसुली नोटीसा चिकटवल्या!वसुलीदारही पाठवायची व्यवस्था केलेली आहे. ह्या बँक अधिकाऱ्यांना लाजा तरी वाटल्या पाहिजेत.
आज टीव्ही पेपरात संपूर्ण भारत व जग पाहतय पुराची काय परिस्थिती आहे आणि तुम्ही नोटिसा पाठवता?म्हणजे
मुख्यमंत्र्यांचेही हे ऐकत नाहीत.ही मोठी जटिल समस्या बळीराजा समोर उभी राहिलेली आहे.ह्या सरकारची नपुसकता दिसुन येत आहे. संपूर्ण भारतभर ह्यांचे सरकार आहे,महाराष्ट्र दिल्लीला जास्तीत जास्त महसूल देतो! असे असताना आज केंद्रीय मंत्री पंतप्रधान येथे फिरकत नाहीत.म्हणजे महाराष्ट्र फक्त देशाला पोसायला आहे काय?मग महाराष्ट्रावर आपत्ती आल्यावर पाठ फिरवायची.ह्या राजवटीने! हिंदुत्वाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करायची.आज शेतकरी संकटात आहे,त्याला आधार कोणाचा?राष्ट्रीय व इतर बँका संकटकालीन परिस्थितीत करवसुलीचा तगादा लावते? हे कितपत योग्य आहे.एक गोष्ट खरी आहे की,आमचे राज्यकर्ते हे नपुसंक व दिल्लीश्वरांचे तळवे चाटणारे आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात आता सत्ताबदला शिवाय पर्याय नाही.भाजपला टाळून,स्थानिक पक्षाला आता मराठी जनतेने कौल द्यावा! भूमी पुत्राची हाक आहे.एकंदरीत २५,००,००० शेतकऱ्यांचे २५ लाख ४७५ कोटी कर्ज आहे.बँकांनी संपूर्ण कर्ज माफी द्यावी! अस कोणीही बोलू शकत नाही.पण हफ्ते देण्यास मुभा तरी देणार? आज आपला बळी राजा चीही आर्त हाक आपण ऐकणार हो सरकार मायबाप!!
Sad :((