
प्रतिनिधी : मिलन शहा
पंजाबी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिंदर बायसेप्सच्या दुखापतीसाठी किरकोळ शस्त्रक्रियेसाठी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते. ऑपरेशन किरकोळ असल्याने ते लवकरच परतणार होते, परंतु अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
वरिंदर घुमान हे भारतीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील एक मानाचे नाव होते. त्यांनी २००९ मध्ये मिस्टर एशिया स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला होता. ते IFBB प्रो कार्ड मिळवणारे पहिले भारतीय बॉडीबिल्डर होते.
२०११ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन ग्रांप्री स्पर्धेत यश मिळवले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
चित्रपटसृष्टीत त्यांनी “कबड्डी वन्स अगेन (२०१२)” या पंजाबी चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. त्यानंतर “रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स (२०१४)” या हिंदी चित्रपटात आणि “मरजावां (२०१९)” मध्येही भूमिका साकारली.
त्यांच्या निधनाने पंजाबसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. चाहत्यांसाठी आणि फिटनेसप्रेमींसाठी ही अपूरणीय हानी ठरली आहे.
Rest in peace sir.
Rip