पडळकर,आव्हाड समर्थकात विधा भवन लॉबीत हाणमारी!!

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून जाहीर करा. काल भवना बाहेर गाडीचा दरवाजा बंद करण्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांच्यात काल बाचाबाची झाली होती. आणि आज विधान भवनात,दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते, समर्थक एकदुसऱ्या ला शिवीगाळ करत एकमेकांच्या विरुद्ध भिडली! बघता बघता त्याचे रूपांतर हाणामारीत झाली.दोन्ही आमदारांचे माणसं विधान भवनाच्या लॉबित एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांना घाणेरड्या शिवीगाळ करीत शारीरिक इजा पोहोचवत होते.असे घाणेरडे प्रकार जर होत असतील तर मग ह्या विधानभवनाच काय पावित्र्य राहील?ही गुंड प्रवृत्तीची मंडळी आत कधी शिरली?हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजेच विधान भवनाची सुरक्षा ही कमकुवत आहे.हा घडलेला प्रकार महाराष्ट्रा चे बिहार, यू पी झाले की काय असं वाटत.महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली.ह्याचा अर्थ भाजपा च्या आमदारानीं गुंडागर्दी सुरू केलेली आहे का? काल ठाणेकरांच्या आमदारांनी चुका केल्या.आता तर मुख्यमंत्री तुमच्या आमदारांनी विधान भवनाच्या लॉबित गुंडागर्दी केलेली आहे,आता तुम्ही काय पाक्षिक कारवाई करताय?इकडे जनतेच लक्ष लागून राहिले आहे.मुख्यमंत्री आपण ही जबाबदारीअध्यक्षनावर टाकून मोकळे झालात.आता मात्र हे सर्व जनता बघत आहे येवळे मात्र ध्यानात ठेवावे.

.


Share

One thought on “पडळकर,आव्हाड समर्थकात विधा भवन लॉबीत हाणमारी!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *