एसएमएस वृत्त ब्युरो
महाराष्ट्र च्या नाशिक मध्ये पत्रकारांवरील भ्याड हलल्याचा ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध. झी २४ तास चे पत्रकार योगेश खरे,
पुढारी चॅनलचे पत्रकार किरण ताजने,व पत्रकार अभिजित सोनवणे, या पत्रकार मित्रावरील भ्याड हल्ल्याचा ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल मुंबई च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत राज्य शासनाकडे पत्रकारांवर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच पत्रकार मित्रांना न्याय मिळवून देण्याकरिता वेळ प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार यासिन पटेल यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा मुंबई अध्यक्ष निसार अली सय्यद यांनी दिला. तसेच इतर पत्रकार संघटना ही या हलल्याचा तीव्र निषेध केला आहे.व कठोर कारवाई ची मागणी ही केली आहे.
जाहीर निषेध त्वरित कारवाई करावी.
सर्वप्रथम पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध! निषेध! निषेध!…
खरंतर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता होय असं म्हटलं जातं,परंतु सध्याच्या मोदी सरकारच्या काळात निर्भीड व निःस्वार्थी पणे पत्रकारित्या करीत असलेल्या पत्रकारांवर सहजरित्या असा भ्याड हल्ला होणे हे अत्यंत चुकीचे आहे.कारण भ्रष्टाचारावत आळा बसवा आणि सामान्य मतदार जनतेची लूट थांबवावी यासाठी असे खरेखुरे पत्रकार समाजासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लाऊन पत्रकारितेचं काम करतात.सदरचे काम करीत असताना भ्रष्टाचारी नमुन्यांचा भ्रष्टाचार जगासमोर येईल आणि आपलं पितळ उघडं पडेल यासाठीच प्रामाणिक पत्रकारांवर हल्ले करून अगदी गल्लीतील गावगुंडासारखे हातापाई करायला भाग पडणे हेच या गावगुंडांचे काम आहे.अशा नालायक वृत्तीच्या लोकांना पोलिस प्रशासनाने वेळीच ठेचून टाकायला हवे,नाहीतर आज पत्रकारांवर हल्ला झाला उद्या कोणावरही वेळ येऊ शकते व भारताचा नेपाळ होऊ शकतो पोलिस प्रशासनाने व सरकारने तर जरूर जाणून घ्यावे…
हो बरोबर