प्रतिनिधी :वैशाली महाडिक
सखोल चौकशी करून यामागील सूत्रधारांवरही कठोर कारवाई व्हावी! :शीतल करदेकर
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि मागील काही दिवसात महाराष्ट्रात पत्रकारांवर झालेले हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी मुंबई सह संपूर्ण राज्यातील पत्रकार फिती लावून तहसील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.
मुंबईतील सर्व पत्रकार संघटना दुपारी १२ वाजता मंत्रालयाशेजारी गांधी पुतळ्यासमोर काळ्ता फिति लावून आंदोलन करणार आहेत.
पत्रकार शशिकांत वारिशे निर्घृण हत्या प्रकरणी आरोपी विरोधात 302 कलम दाखल असला तरी पत्रकार संरक्षण करण्याची कलमे ही लावावी! एन युजे महाराष्ट्र या घटनेचा तीव्र निषेध करत असून मुंबई येथील आंदोलनातही
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र सहभागी होणार आहे!
ज्या पद्धतीने खुले आम वारिशे यांची हत्या करण्यात आली, ही घटना वेदनादाई ,संतापजनक आहे . महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेला अशोभनीय व लाजिरवाणी अशी घटना आहे.
महाराष्ट्र सरकारने याबाबत कठोर भूमिका ध्यावी अशी आमची आग्रही
मागणी आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे एन यु जे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली आहे.