पन्नालाल सुराणा आणि बाबा आढाव यांच्या स्मृतींना उजाळा – ११ डिसेंबरला अभिवादन सभा.

Share

एसएमएस-प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

मुंबई :समाजवादी चळवळीतील दोन ज्येष्ठ मार्गदर्शकांची आठवण जपण्यासाठी केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी पन्नालाल सुराणा यांचे २ डिसेंबर २०२५ रोजी तर कष्टकऱ्यांचे नेते, कृतिशील विचारवंत बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही अभिवादन सभा गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, आरे रोड, गोरेगाव (प.) येथील गोविंद दळवी सभागृहात होणार आहे. समाजवादी परंपरेत काम करणाऱ्या सर्वांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Share

4 thoughts on “पन्नालाल सुराणा आणि बाबा आढाव यांच्या स्मृतींना उजाळा – ११ डिसेंबरला अभिवादन सभा.

  1. समाजा साठी खुप सारे योगदान दिले आहे या थोर वंतानी असे हे थोर पन्नालाल सुराणा आणि कृतिशील विचारवंत बाबा आढाव याना माझा मना पासुन नमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *