पवार साहेब निवृत्त..??

Share


प्रतिनिध:सुरेश बोरले

माणसाच्या आयुष्यामध्ये येणारा एक मोठा क्षण म्हणा किंवा मैलाचा दगड म्हणजेच, निवृत्ती. माणसाचं आयुष्य जसजसं वाढत जाते, तस तशी माणसाची शारीरिक हालचाल व मानसिकता सगळ्या ह्या गोष्टींवर निर्बंध येतात आणि त्यामध्ये त्या वयात साठी ती बुद्धी नाठी, अशी म्हण आहे. ते बरोबरी आहे. या वयात माणूस अनेक व्याधींनी पछाडलेला असतो, त्यामुळे स्वतःवर ताबा मिळवू शकत नाही. मग अशावेळी निश्चय करतो की, आता आपण आता येथे थांबावं, आपल्या कार्याची धुरा आपण पुढच्या पिढीला देऊ! ही सदिच्छा असते. कोणताही खेळाडू मैदानावर, आपल्या क्षमतेनुसार खेळ करीत असतो. क्षमता संपायची वेळ आली की, त्यांना शरीराकडून संकेत येतात की आता क्षमता संपण्याची वेळ आलेली आहे. उदाहरणार्थ सुनील गावस्कर ते भारत रतन, सचिन तेंडुलकर हे उच्च स्थानी असताना, अतिशय उत्कृष्ट खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचे नाव उज्वल केले.परंतु एका विशेष काळी निवृत्ती पत्करली.शरीर त्यांना संकेत देत होते,की आता बास! ते अजूनही खेळू शकले असते,परंतु शारीरिक हनी बऱ्याच प्रमाणात झाली असती.हे त्यांना माहीत होते. परंतु नियती आणि काळ याच्यापुढे कोणी जाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा ह्या निसर्गाने घातलेल्या आहेत. त्याप्रमाणे जग पुढे जात. माणसाला वयानुसार सामर्थ्य कळते की आता आपली वेळ आलेली आहे आणि त्याचवेळी योग्य निर्णय घेतल्यास, तर ते परत भारी पडू शकत नाही. माणसाला त्याच त्याच गोष्टी करून करून वीट आलेला असतो. सुरुवातीचे दिवस चांगले असतात. परंतु जसे जसे पुढे माणूस जातो तसा पुढचा मार्ग कठीण होत जातो. उदाहरणार्थ शरद चंद्रजी पवार यांनी नुकताच एनसीपी पक्षाचा,अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.पाहायला गेलं तर ही चांगली गोष्ट आहे.तर एका बाजूने वाईटही वाटतं.कारण सध्या तरी, त्यांच्या एवढा मुरब्बी राजकारणी महाराष्ट्राच्या काय राष्ट्रीय पातळीवरती राजकारणात नाही.कारण भलेभले राजकारणी शेवटी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. एक मुरब्बी राजकारणी म्हणून सगळ्यांच्या पुढे आहेत. त्यांनी राजकारण अतिशय जवळून पाहिलेल आहे, ते त्यांनी कोळून प्यायला आहे.शिवाय त्यांनी या प्रवाहात आपल्या संपूर्ण कुटुंबाला आणलेलं आहे, हे विशेष. आयुष्यभर ते राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये सुरक्षा मंत्री होते पुन्हा मुख्यमंत्री झाले.एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव या माणसाच्या गाठीला आहे.तसेच महाराष्ट्राची भारताच्या राजकारणात, त्यांनी प्रतिमा उंच केलेली आहे, त्याला तोड नाही.कारण आज महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा अभिमान आहे, पवार साहेबांनी, दुसरी फळी अतिशय सुंदर तयार केलेली आहे. माननीय.अजित पवार,सुप्रिया सुळे यांना त्यांनी राजकारणात आणून त्यांच्यावर जबाबदारी टाकून,त्यांना व्यवस्थित तयार केलेल आहे. त्यामुळे आज ते समाधानाने निवृत्तीच्या मार्गावर आहेत आणि ते योग्य आहे. तो निसर्गाचा नियम आहे.पण आज महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांच्या सल्ल्याची अत्यंत गरज आहे. विरोधी पक्षातील माणसे सुद्धा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात हे विशेष.पण यापुढे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला मार्गदर्शन करावे. अशी लोकांची मनो मनी इच्छा आहे.कारण सध्याच राजकारण हे अतिशय हिन दर्जाचे राजकारण आहे. पण शरद रावांनी खुल्या मनाने दिलखुलास पणे उच्च राजकारण केले, मग तो पक्ष कोणताही असो, त्यांच्या संगतीत जो पक्ष आल,त्यांना ते घेऊन पुढे घेऊन गेले. आताचच महा आघाडीतील शिवसेनेच पहा!त्यांच्या प्रमुखांना राजकारणाचा गंध कोणताही नाही. परंतु त्यांना मुख्यमंत्री बनवले आणि आता त्यांना सावरत आहेत.ही एक मोठी गोष्ट आहे. राजकारणामध्ये कोणाला कुठे बसवायचं, कोणाला कुठे पाडायचं व कोणाला कुठे उच्च पातळीवर नेऊन ठेवायचे हा त्यांचा हातखंडा आहे. परंतु एकंदरीत पाहता, जवळजवळ 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी राजकारणात, आपला अमूल्य वेळ व्यतीत केलेला आहे. चांगली पकड त्यांनी राजकारणावर मिळवलेली आहे. कारण जुना जाणत्यांन मध्ये आता तेच उरले आहेत. त्यामुळे त्यांना लोकप्रियताही जबरदस्त आहे. महाराष्ट्राच राजकारण त्यांच्यापुढे जाऊ शकत नाही! कारण एवढा अनुभवाचा कस त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी अध्यक्ष पद निवृत्तीचा निर्णय जरूर घ्यावा, कारण पुढच्या फळीला संधी मिळाली पाहिजे हेही खरं आहे. आता त्यांनी राजीनामा दिल्यावर,पुढची कसोटी ही मार्गदर्शकाची महाराष्ट्राच्या राजकारणासाठी करावी.अशी लोकांची मोठी अपेक्षा आहे. मार्गदर्शकता ही आपली ख्याती आहे.ते त्यांनी तशीच ठेवावी. कोणत्याही पक्षाचा माणूस त्यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी आला, तर त्याला कोणताही भेदभाव न ठेवता मार्गदर्शन करतात . असे तमाम जनतेला वाटते. कारण ही एक अतिशय दांडगी अशी व्यक्ती आहे. त्यामुळे लोकांकडून अपेक्षा आहे, शरद रावजी आपण राजकारणा मधून बाहेर पडत असलात,तरी तुमच्या सल्ल्याच्या शिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होणार नाही? हे जनहित आहे किंवा जे जनतेला माहित आहे. जनता आज थायमुकलून रडत आहे,की शरद रावजी राजीनामा मागे घ्या! राजीनामा मागे घ्या! पण या भीष्माचार्यांच्या मनात काय आहे?हे त्यांनाच ठाव?परंतु ही आपली प्रतिमा शरद रावजींनी राजकारण उभी केली आहे, त्याला दाद नाही.हे त्याचं कौशल्य आहे. राजकारणातील अनेक प्रकरणे हाताळताना,त्यांनी कुठल्याही पक्षातील माणसांना कधी शिव्या नाही दिल्या. आपल्या मधुर वाणीने त्यांनी संपूर्ण राजकारणाच जग जिंकलं. भारताचा जिंकल आणि आज ते अतिशय सुखी मनाने निवृत्ती पत्करत आहेत.येथे समाधानी आहेत ही, त्यांना अनेक व्याधी असतानाही,त्यांनी राजकारणाचा डोलारा सांभाळला हे विशेष. उदाहरणार्थ घ्या ना! आपले माझी पंतप्रधान माननीय.अटल बिहारी बाजपेयी त्यांच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले. शारीरिक पडझड झाली. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात थोडे कमी पडले.
आपण शेवटी माणस आहोत, आपल्याला निसर्गाने बंधने टाकलेली आहेत. त्यामुळे मर्यादा येतेच. शरद रावजी आपण सुखी समाधानाने निवृत्ती करावी आणि आपली जी धुरा आहे ती! दुसऱ्या फळीला सोपवावी. परंतु सध्या त्यातील एक व्यक्ती ही भाजपात जाणार मुख्यमंत्री बनé ण्याचे स्वप्न पाहत आहेत. कदाचित लोकांना वाटतंय की,आपल्या पुतण्याच्या ह्या वागण्यामुळे किंवा अनेक चुका त्यांनी केलेल्या आहेत. त्यांची ही कृती पवारांच्या पक्षाला हानिकारक असू शकते, म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला असावा? ही अंदर की बात आहे.काहीही असो जो शरद रावांना भिडला तो संपला. नुकतच एसटी संपाचा उदाहरण घ्या! त्यांच्या घरावरती मोर्चाने चपला फेकल्या, त्या चपला त्याच वकिलाच्या गालावर पडल्या! .आता त्या वकिलाची वर्तमान काय परिस्थिती आहे? हे जनतेने पाहिला आहे. शेवटी एकच म्हणाव लागेल, की डॉन का इंतजार तो सारे मुल्को की पूलीस कर रही है,डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है! साहेबांचा प्रत्येक निर्णय सत्ताधारी, विरोधक आणि राजकारण हादरणारा असतो त्यामुळे वेट अँड वॉच…


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *