पवित्र रमजान महिन्यात माफिया गॅंग चे कारनामे…

Share

File Photo


प्रतिनिधी :सुरेश बोरले

काही दिवसान पूर्वी टीव्ही वर एक पटल दाखवण्यात आलं होतं, एका मोठ्या ट्रक मध्ये शेवया अत्यंत भिजलेल्या अवस्थेत पाकीट बंद होत्या. ज्या ट्रक मध्ये ही सगळी पाकीट ठेवली होती, ते ट्रक जबरदस्तीने सर्विस सेंटरवर नेऊन, त्यावर मुद्दामहून पाणी ओतण्यात आले होते. भारत हा सर्वधर्म समभावाचा देश आहे.सर्व जाती-धर्मांचे लोक येथे आपले सण व सर्व धार्मिक विधी आनंदाने साजरे करतात. समता व बंधुता ही आपल्या राज्यघटनेची मूल्य आहेत.त्यामुळे दिवाळी असो, होळी असो, ईद असो, सगळेजण आपल्या परीने बंधू भावाने श्रद्धेने सण साजरे करतात.तर मुस्लिम बंधूंचा रमजानचा हा पवित्र महिना मात्र रोजाने सोडवतात. तर काही ठिकाणी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न इफ्तार खानपान सेवेमध्ये होत असतो. त्यामध्ये राजकीय लोक नाटकिय रंगाने त्यामध्ये सामील होत असतात.हे लोकांना माहित आहे. पण या मेजवानीला इफ्तार पार्टी असे संबोधतात पण मी प्रमदांचा पाक महिना असल्याने, इफ्तार मेजवानीच बोलेन. अशा सणात अनेक फळांची गरज रोजा सोडवताना आवश्यक असते, म्हणून फळे थोडीशी महाग असतात.पण इफ्तार पार्टी मेजवानी असो किंवा रोजाचे जेवण असो,ते झाल्यावर शीर कुर्मा हा जबरदस्त महत्त्वाचा प्रकार आहे. तो खाल्ल्याशिवाय रोजा पूर्ण होत नाही. मुळात ही शेवयांची खीर असते. त्यामध्ये सुकामेवा व अनेक पौष्टिक जिन्नस असतात. त्यामुळे शीरकुर्मा ला भरत महत्त्व आहे. ठाणे परिसरातील भिवंडी शहरात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव राहतात.त्यामुळे रमजानच्या महिन्यात, या शहरांमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. परंतु शंभरच्या आत मिळणारी सुकी शेव अचानक,तीनशे पन्नास रुपये किलोच्या दराने विकु लागली. भाव 350 रुपयाला मिळणारी शेव सणासाठी माणूस पाव किलो, अर्धा किलो घेणारच.पण त्या पैशात शेवया या किलोवर यायच्या?त्याच काय! परंतु लोकांना माफक दरात शीर कुरमा मेळावा म्हणून, एका व्यापाऱ्याने , खास उत्तर प्रदेशातून दोन ट्रक लोकांसाठी सुक्या शेवया आणायचे ठरवले. ट्रक निघालेही परंतु बाजार भावांचा चलन फुगवटा करणारे माफिया, यांना ही गोष्ट कळली. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून द्रुतगती मार्गावर ट्रक अडवले. तर ते ट्रक थांबताच, माफीयांनी त्या ट्रकला घेरले व त्यामधील कर्मचाऱ्यांना सरळ बंदुकीने धाकाने जीवनिशी मारण्याच्या धमक्या देऊन, शिवाय दोन्ही ट्रकच्या चाव्या व त्यांचे भ्रमणध्वनी सुद्धा हिसकावून घेतले .यामध्ये त्या गरीब कर्मचाऱ्यांचा काय दोष?ते दोन्ही ट्रक नंतर,त्यांनी सर्विस सेंटरला नेऊन, त्या शेवयांच्या पाकिटांवर पाण्याचे फवारे जबरदस्तीने उडवले.संपूर्ण शेवया खराब केल्या. त्या व्यापाऱ्याचे मोठे नुकसान केले. शिवाय हे माफिया संपूर्ण बाजारात फिरत होते, शेवया कुठून येणार,आमच्याकडंन घ्या पण 350 च्या किमतीनेच विका! अन्यथा याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. ह्या गोष्टी जनतेला समजल्यावर.प्रशासन या माफियांवर कारवाई का करीत नाही? म्हणून लोक आश्चर्यचकित आहेत.त्यामुळे रमजानचा महिना असताना लोकांना तीनशे पट महाग दराने शेवया विकत घ्याव्या लागत आहेत. हे दुःख आहे त्याशिवाय, हे माफीया मंडळी या शेवया खुल्या करून बाजारात विकत आहेत. त्यामुळे त्या शेवयांच्या दर्जाचे काय?हे काम सरकारी अन्न व औषध प्रशासनाचे आहे.मग ते कुठे आहेत?का धाडी टाकत नाहीत? का कारवाई करीत नाहीत? म्हणजे येथेही सरकारी कर्मचारी आपला स्वार्थ जपत आहेत का? तेरी भी चूप,मेरी भी चुप. असा सावळा गोंधळ आहे.त्या माफियांवर, कायदेशीर मोठी कारवाई व्हावी!अशी येथील जनतेची मागणी आहे. कारण उपरवाल्यालाही न सोडणारे हे माफिया,नराधम आहेत.पण ईश्वराची विटंबना करतात त्यांना नियतीच कठोर शासन करते. कारण खीर कुर्मा हा नैवेद्य प्रसादाचा भाग आहे. त्याची विटंबना करणे म्हणजे उपरवाल्याचा, अपमान करण्या सारखे आहे. हे तरी त्या माफियांना कळावे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *