पाळीव सायबरीयन मांजर पळवताना तरुणी सि्सिटिव्हीत कैद…

Share

सिसिटीव्ही कॅमेरातील चित्र.

प्रतिनिधी:मिलन शहा

मालाड, ता. २(बातमीदार)दिनांक १ऑगस्ट रोजी, दुपारी अंदाजे १२:४५ वाजता, भरदिवसा  दिड वर्ष वय असलेल्या पाळीव मांजर ओरेओ चारकोप येथील गणेश वैभव   सोसायटीच्या परिसरातून उचलून नेताना तरुणी सि्सिटिव्हीत कैद.

 एक तरुणी सहजपणे गणेश वैभव

सोसायटीमध्ये प्रवेश करून कोणाला ही संशय  न येऊ देता, साइबेरियन जातीची    ओरेओ नावाची वृषाली शर्मा यांची सायबरियन जातीची पाळीव मांजर घेऊन निघून गेली. या मांजरीची किंमत सुमारे ₹५०,००० इतकी आहे.

या घटनेची माहिती चारकोप पोलिसात लेखी देण्यात आली आहे.तसेच सिसिटीव्ही फुटेज ही देण्यात आले आहे. पोलीस सिसिटीव्ही पडताळून पुढील तपास करत आहे.

 येथील रहिवाशांनी असा प्रश्न  उपस्थित केला आहे की  जर मांजरा ऐवजी एकाद्या मुलाचे याच प्रकारे अपहरण सहजतेने झाले असते तर? ही घटना  अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. यामुळे सोसायटीतील सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दर्जाही अत्यंत खराब असल्याने चेहरा निट दिसत नाहीत मात्र पोलीस जोमाने तपास करत आहे.अशी माहिती वृषाली शर्मा मांजरीची मालक यांनी दिली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *